पाली-भुतिवलीवर तरु णांचा वावर
By admin | Published: April 7, 2016 01:21 AM2016-04-07T01:21:07+5:302016-04-07T01:21:07+5:30
कर्जत तालुक्यातील पाली -भुतिवली धरणात गेल्या अनेक वर्षांत पोहायला येणाऱ्यांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे.
नेरळ : कर्जत तालुक्यातील पाली -भुतिवली धरणात गेल्या अनेक वर्षांत पोहायला येणाऱ्यांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. आजही या धरणात मोठ्या प्रमाणात तरु ण -तरूणी पोहण्याची हौस भागविण्यासाठी येत आहेत. धरणावर प्रेमीयुगुलांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र याकडे पाटबंधारे विभाग आणि पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून केला जात आहे.
कर्जत तालुक्यातील पाली -भुतिवली येथे लघु पाटबंधारे विभागाचे धरण आहे. धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असून धरणात पोहण्यासाठी बंदी असताना येथे मोठ्या प्रमाणात प्रेमीयुगुलांची गर्दी दिसून येते. या धरणात पोहणे धोकादायक असल्याचे अनेक घटनांमधून स्पष्ट झाले आहे. तरीही या धरणात धोकादायक प्रेमीयुगुलांचे पोहणे सुरूच आहे. ६ मार्चला या पाली -भुतिवली धरणावर मुंबई येथील चार विद्यार्थी पोहण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यातील तीन जण बुडाले होते. त्यातील दोन सुखरूप बाहेर पडले, तर एकाचा बुडून मृत्यू झाला. अशा पाच घटना या धरणात घडल्या आहेत. मात्र सतत होणाऱ्या या घटनांकडे लघु पाटबंधारे विभाग आणि पोलीस प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.
आजवर घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या दुर्घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे सर्वांनीच याबाबत दक्षता देण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली. येथे सुरक्षेची काळजी घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)