रायगडमध्ये युवा मतदार ठरणार निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 03:31 AM2019-04-02T03:31:23+5:302019-04-02T03:31:46+5:30

३५ हजार ४५२ नवमतदार : एकूण लोकसंख्या ३१ लाख ७३ हजार ३५८

Young voters will be crucial in Raigad | रायगडमध्ये युवा मतदार ठरणार निर्णायक

रायगडमध्ये युवा मतदार ठरणार निर्णायक

Next

जयंत धुळप 

अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातील एकूण लोकसंख्या ३१ लाख ७३ हजार ३५८ असून त्यातील १८ वर्षांवरील लोकसंख्या २२ लाख ५४ हजार २२२ आहे, त्याची टक्केवारी७१.०३ आहे. तर २२ लाख २५९ नोंदणीकृत मतदार असून यामध्ये १८ ते ३९ वयोगटातील तरुणांची संख्या १ लाख १२ हजार ७५३ आहे. त्यापैकी ३१.४४ टक्के म्हणजे तब्बल ३५ हजार ४५२ जणांची जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या नवमतदार नोंदणी अभियानातून नोंद झाली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ते प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मतदान हक्क प्राप्त १८ ते ८०(व अधिक) वयोगटातील मतदारांच्या सरकारकडून अपेक्षा वयोगट परत्वे वेगवेगळ््या असतात आणि वयपरत्वे वयोगट सर्वसाधारणपणे १८ ते ३९, ४० ते ५९ आणि ६० ते ८०(व अधिक) असे मानले जातात.

विशेषत: शासकीय योजना निर्मितीच्या वेळी अशा स्वरूपाचा वयोगट गृहीत धरला जातो. या पार्श्वभूमीवर रायगड लोकसभा मतदार संघातील १८ वर्षावरील लोकसंख्या एकूण २२ लाख ५४ हजार २२२ असून त्यातील २२ लाख २५९ मतदान हक्क प्राप्त नोंदणीकृत अधिकृत मतदारांमध्ये सर्वाधिक ५ लाख १० हजार ३७० मतदार हे ३० ते ३९ या वयोगटातील आहेत. त्यावरील म्हणजे २० ते २९ या वयोगटातील मतदार ४ लाख २६ हजार १४० आहेत. परिणामी रायगड लोकसभा मतदार संघात १८ ते ३९ या वयोगटातील मतदान हक्क प्राप्त मतदारांची एकूण संख्या ९ लाख ७१ हजार ९६२ आहे.

वयपरत्वे दुसऱ्या टप्प्यातील
च्४० ते ४९ वयोगटातील मतदार संख्या ४ लाख ३८ हजार ५९३ आहे तर ५० ते ५९ वयोगटातील मतदार संख्या ३ लाख ६० हजार ९८९ आहे. परिणामी ४० ते ५९ वयोगटातील एकूण मतदार संख्या ७ लाख ९९ हजार ५८२ आहे.

वयपरत्वे तिसऱ्या टप्प्यातील
च्६० ते ८०(व अधिक)या वयोगटात ६० ते ६९ वयोगटात २ लाख ३१ हजार ३४२, ७० ते ७९ वयोगटात १ लाख २६ हजार ९६४ तर ८० व अधिक या वयोगटात ७० हजार ४०९ असे एकूण ४ लाख २८ हजार ७१५ मतदार आहेत.
 

Web Title: Young voters will be crucial in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.