दासगाव : लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसतशी मतदानाची उत्सुकता वाढीस लागली आहे. उमेदवारदेखील प्रचारावर भर देऊ लागले आहेत. महाड मतदारसंघात आघाडीच्या आणि युतीच्या उमेदवारांच्या प्रचारात मात्रतरुणांची कमतरता दिसून येत आहे. तरुण मतदार प्रचारातून अलिप्त असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांच्या प्रचारासाठी बाहेर पडले आहेत. कॉर्नर सभा, जाहीर सभा या व्यतिरिक्त राजकीय पक्षांनी प्रचारासाठी सोशल मीडियाचाही तितकाच वापर सुरू केला आहे. या निवडणुकीत तरु णांची मतेदेखील तितकीच महत्त्वाची असल्याने तरु णांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक उमेदवार प्रयत्नशील आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या प्रमाणे तरु णवर्ग बाहेर पडला होता, ते चित्र आता दिसून येत नाही. सुरू असलेल्या परीक्षा, तीव्र उन्हाळा आणि सोशल मीडियात तरु णवर्ग गुंतल्याने प्रचारकार्यात दिसून येत नाही.
रायगड लोकसभा निवडणुकीसाठी गेले काही दिवस महाड आणि परिसरात विविध पक्षांच्या सभा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष आघाडीची सभा चांदे क्र ीडांगण येथे झाली. मात्र, या सभेलादेखील एक ठरावीक वर्गच उपस्थित होता. त्यानंतर महाडमध्ये विविध ठिकाणी सभा होत असून, या सभेलाही तरु णांची संख्या कमी आहे. आघाडीच्या प्रचारकामातही तरु णवर्गाने पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे.शिवसेना आणि भाजप आघाडीच्या बाबतीतही तीच अवस्था समोर येत असून महाडमध्ये तरु णवर्ग लोकसभा निवडणुकीत तितकासासक्रि य झालेला नाही.च्यावर्षी तालुक्यात १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरु ण मतदारांची संख्या आता जवळपास नऊ हजारांपर्यंत आहे. हे मतदार पहिल्यांदाच मतदान करत आहेत. लोकसभा निवडणुकीत या मतदारांना मतदान करण्यास उत्सुकता असली, तरी पक्षप्रचार आणि पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ बाहेर पडण्यास उत्सुकता नसल्याचे विविध सभांतून आणि प्रचार कार्यक्रमातून दिसून आले आहे.राजकीय नेत्यांच्या पक्षबदलूधोरणामुळे तरु णाई संभ्रमातच्सध्या सुरू असलेली राजकीय परिस्थिती आणि पक्षातील नेत्यांची पक्षबदलू धोरणे यामुळे तरु ण मतदार संभ्रमित झाला आहे. कोणता झेंडा घेऊ हाती, असा प्रश्न त्याच्या समोर आहे. नेते कधी एक होतील हे सांगता येत नाही, यामुळे तरु णवर्ग किमान रायगड आणि महाडमध्ये तरी लोकसभा निवडणुकीत उमेदवार प्रचारातून थोडा लांबच राहिला असल्याचे चित्र समोर येत आहे.