शाळाबाह्य मुले शोधमोहिमेत रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला यश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 02:13 AM2019-05-09T02:13:17+5:302019-05-09T02:13:37+5:30

शासनाच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या शाळाबाह्य मुले शोधमोहिमेस रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे यश आले.

Youth of Raigad Zilla Parishad's education department achieve success in search of out-of-school children | शाळाबाह्य मुले शोधमोहिमेत रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला यश

शाळाबाह्य मुले शोधमोहिमेत रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला यश

Next

- जयंत धुळप
अलिबाग : ‘ज्ञानदीप मिटवी अज्ञान’ हे ब्रीद स्वीकारून, जन्माला आलेले प्रत्येक मूल शिकलेच पाहिजे, यासाठी शासनाच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या शाळाबाह्य मुले शोधमोहिमेस रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे यश आले आहे.
२०१८-१९ या शैक्षणिक वर्षात रायगड जिल्ह्यात शोधमोहिमेत ४८५ मुले शाळाबाह्य निष्पन्न झाली. यामध्ये २६२ मुलांचा तर २२३ मुलींचा समावेश आहे. या ४८५ शाळाबाह्य मुलांपैकी १४८ मुले व ११३ मुली अशा एकूण २६१ मुलांना विशेष प्रशिक्षण देऊन शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यात आले. मात्र, उर्वरित ११४ मुले व ११० मुली अशी एकूण २२४ मुले शोधमोहिमेअंती परराज्यात व परजिल्ह्यात स्थलांतरित झाली असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊ न त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले जाते. यासाठी दरवर्षी घरोघरी जाऊ न मुलांचा शोध घेण्याचे नियोजन केले जाते. स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील बालकांचा शोधदेखील घेण्यात येतो. शाळेत प्रवेश घेतला; पण कायम गैरहजर राहत असलेल्या मुलांचा या मोहिमेत शोध घेण्यात आला. यामध्ये तब्बल ४८५ मुले ही शाळाबाह्य आढळून आली. सर्वाधिक शाळाबाह्य मुले पनवेल तालुक्यात १३५ तर खालापूर तालुक्यात ९७ निष्पन्न झाली तर म्हसळा, श्रीवर्धन व पोलादपूर या तीन तालुक्यांत एकही शाळाबाह्य मूल निष्पन्न झाले
नाही.
वीटभट्टीवरील हंगामी स्थलांतरितांच्या मुलांमध्ये शाळाबाह्य मुले मोठ्या प्रमाणावर असतात, त्या मुलांचादेखील शोध घेण्यात आला. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात स्थलांतरित होऊन वीटभट्टीवर आलेली एकूण मुलांची संख्या ७२९ असून त्यामध्ये ३८६ मुले व ३४३ मुलींचा समावेश आहे. सर्वाधिक २९३ मुले एकट्या पनवेल तालुक्यात असून या मध्ये मुले १४१ तर मुली १५२ आहेत.

वीटभट्टी स्थलांतरित एकूण ७२९ मुलांपैकी ११४ मुले व ११५ मुली अशी एकूण २२९ मुले शिक्षण हमी कार्ड असलेली मुले आहेत. वीटभट्टीवर येऊन स्थलांतरित झालेल्या एकूण मुलांची संख्या ६४३ असून त्यामध्ये ३४३ मुले, तर ३०० मुलींचा समावेश आहे. तर उर्वरित १७० मुले व १३९ मुली अशा एकूण ३०९ मुलांना शिक्षण हमी कार्ड देण्यात आले आहे.

Web Title: Youth of Raigad Zilla Parishad's education department achieve success in search of out-of-school children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.