धाटाव : समाजात महिलेने मानमर्यादा राखून राहिले पाहिजे, ज्या घरात आई सुसंस्कृत असेल त्यांच्याच घरात शिवाजी जन्माला येतात. अध्यात्मातील शक्ती माणसाला तारत असते, त्यासाठी सत्कर्म करा, शिक्षण घ्या, मोठमोठ्यांचे चरित्र वाचा, आपल्या मुला-मुलींना सुद्धा वाचायला द्या यातूनच आपला विकास होईल. नेतृत्वाची जाण असणारा माणूस तयार व्हायला हवे, व्यसनापासून दूर राहायला हवे, नवीन क्र ांती घडली पाहिजे यासाठी तरुणांनी पुढे यायला हवे, विचारांचे वैभव मिळवा, असे प्रतिपादन अॅड. हनुमंत धुमाळ यांनी केले.रोह्यातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात नुकत्याच रोहा-अष्टमी मराठा विकास मंडळाच्या वतीने आयोजित मराठा समाज मेळाव्यात ते बोलत होते. आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालून धुमाळ यांनी २८८ आमदारांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त आमदार मराठा असताना मराठा समाजाला आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागल्याची खंत व्यक्त केली. विश्वास नांगरे पाटलांसारख्या कणखर अधिकाºयांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून मेहनत घ्या,मोठमोठ्या पदांवर काम करा, मुलांना चांगले शिक्षण द्या, ज्यांना आधार नाही त्यांना खरोखर आधार द्या, सरकारला वाकवायचे असेल तर आपली प्रगती करा, असे ते म्हणाले.या कार्यक्रमाला रोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, शिवसेनेचे तालुकाप्रमुख समीर शेडगे, नगरसेविका सुजाता चाळके, समीक्षा बामणे, सारिका पायगुडे आदी उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्र माचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन किशोर तावडे यांनी केले.
नवीन क्र ांती घडवण्यासाठी तरुणांनी पुढे यावे-धुमाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:25 AM