श्रमदानातून तरुणांनी काढला बंधाऱ्यातील गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:22 AM2019-05-29T00:22:20+5:302019-05-29T00:22:25+5:30

नेरळ गावातील तरुण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एकत्र झाले आणि त्यांनी १५ वर्षांपासून माती आणि दगडात पूर्ण भरून गेलेल्या बंधा-यातील गाळ काढण्यासाठी श्रमदान केले.

Youth took away from labor the mud of the dam | श्रमदानातून तरुणांनी काढला बंधाऱ्यातील गाळ

श्रमदानातून तरुणांनी काढला बंधाऱ्यातील गाळ

Next

नेरळ : नेरळ गावातील तरुण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एकत्र झाले आणि त्यांनी १५ वर्षांपासून माती आणि दगडात पूर्ण भरून गेलेल्या बंधा-यातील गाळ काढण्यासाठी श्रमदान केले. त्यामुळे त्या बंधाºयाने मोकळा श्वास घेतला असून या पावसाळ्यात कोमलवाडीमधील पाणीटंचाई काही प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे.
नेरळ गावातील मानव अधिकार संस्थेचे कार्यकर्ते आणि तरुण यांनी नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील कोमलवाडीमध्ये निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी काय करावे अशी माहिती कोमलवाडीमधील आदिवासी ग्रामस्थांना विचारून घेतली. स्थानिक कार्यकर्ते सुनील कांबडी यांनी वाडीच्या मागे असलेल्या ओहोळातील बंधारा दगड, माती आणि गाळाने भरला असल्याची माहिती दिली. त्यानुसार मानव अधिकार संस्थेचे कार्यकर्ते असलेले प्रमोद डबरे, विकास कराळे, दिनकर बदे, रोहित गोरे, जगदीश साळुंके, सोनू शेख, कमलेश कराडकर, जयेश कदम,रवींद्र खांबल आणि रवींद्र मिसाळ यांनी स्थानिक आदिवासींना सोबत घेऊन २५ मे रोजी श्रमदान सुरू केले. प्रमोद डबरे यांनी श्रीफळ वाढवून श्रमदानास सुरुवात केली,त्यावेळी स्थानिक आदिवासी देखील या तरुणांच्या मदतीला आले. दिवसभर श्रमदान करून काढण्यात आलेली माती आणि दगड स्थानिक कार्यकर्ते यांनी तेथे आणून माती आणि दगड डम्परमधून टाकून नेले. त्यामुळे १५ वर्षांपूर्वी पावसाळ्यात माती आणि दगडात गाडला गेलेला सिमेंट बंधारा पुन्हा मोकळा झाला. बंधाºयातून किमान २० डम्पर माती बाहेर काढण्यात तरुणांना आणि आदिवासी यांना यश आले.
>दरवर्षी भासते पाणीटंचाई
माथेरान डोंगरात २००५ मध्ये भूस्खलन झाले होते. यात मोठ्या प्रमाणात दगड आणि माती खाली येऊन अनेक नाले आणि बंधारे मातीने भरून गेले होते.
त्यामुळे दरवर्षी या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे दरवर्षी पाणी वरच्या वर वाहून जाणाºया त्या सिमेंट बंधाºयात यावर्षी पाण्याचा साठा होणार आहे.
त्यामुळे त्या सिमेंट बंधाºयाच्या खाली असलेल्या कोमलवाडी ग्रामस्थांच्या विहिरीत पाणीसाठा अधिक प्रमाणात होणार आहे. त्याचवेळी ग्रामस्थांची पाण्याची टंचाई काही प्रमाणात कमी होणार आहे. त्याबद्दल कोमलवाडी ग्रामस्थ सुनील कांबडी यांनी मानव अधिकार मंडळाचे आभार मानले.

Web Title: Youth took away from labor the mud of the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.