रोह्यात मित्रांनीच केली तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 04:51 AM2018-09-29T04:51:44+5:302018-09-29T04:52:16+5:30

रोहा शहरातून बेपत्ता झालेल्या तरुणाची हत्या त्याच्याच मित्रांनी केली असून, या प्रकरणी रोहा पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोघांना अटक केली आहे.

youth was killed by friends in Roha | रोह्यात मित्रांनीच केली तरुणाची हत्या

रोह्यात मित्रांनीच केली तरुणाची हत्या

googlenewsNext

रोहा - शहरातून बेपत्ता झालेल्या तरुणाची हत्या त्याच्याच मित्रांनी केली असून, या प्रकरणी रोहा पोलिसांनी हत्या करणाऱ्या दोघांना अटक केली आहे.
दोन दिवसांपूर्वी जागृत संदीप मोरे (१८, रा. रोठ खु.) मित्रांसोबत घराबाहेर पडला होता. मात्र, तो घरी न परतल्याने त्याच्या वडिलांनी रोहा पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली. त्यानंतर रोहा-तांबडी मार्गावरील जंगल भागात निर्जनस्थळी तरुणाचा मृतदेह आढळला. हत्येच्या या घटनेमुळे संपूर्ण रोहे तालुक्यात खळबळ उडाली. जागृत मोरे हा मित्रांसोबत बुधवार, २६ सप्टेंबर रोजी दुपारी १.४५ च्या सुमारास घरातून बाहेर पडला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्याच्या वडिलांनी रोहा पोलिसांत हरविल्याची तक्रार दाखल केली.
दरम्यान, रोहा-तांबडी मार्गावर हनुमान टेकडीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या निर्जनस्थळी त्याचा मृतदेह आढळला. मारेकºयांनी दगडांनी तरुणाचा चेहरा ठेचला होता. या प्रकरणी पोलिसांनी सतीश संजय मोरे (रा. रोठ खु.), सुनील अंकुश कांबळे (रा. वरसे) या दोघांना ताब्यात घेतले आहे. जुगार खेळण्यासाठी गळ्यातील सुमारे एक लाख रु पये किमतीची चेन मित्रांना देण्यास नकार दिल्याने ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
हत्येमुळे परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून कोलाड, पाली, रेवदंडा, नागोठणे पोलीस ठाण्यातून अतिरिक्त पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.
दोन संशयित तरुणांविरोधात खून करणे व पुरावा नष्ट करणे, या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. खुनाचा तपास जलदगतीने लागावा, याकरिता अधिक पोलीस बळ व ठसे तज्ज्ञांना बोलाविण्यात आले होते.

Web Title: youth was killed by friends in Roha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.