बोर्ली-मांडला/मुरुड : रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि अलिबाग तालुक्यातील परिसर हा निसर्गरम्य नारळी-पोफळीच्या बागांनी नटलेला आहे. वाऱ्यावर डोलणाऱ्या नारळी-पोफळीच्या बागा हे या ठिकाणचे वैशिष्ट्य होय. मात्र वृक्षाच्या झावळीपासून झाप तयार करण्याच्या व्यवसायावर प्लॅस्टिकच्या ताडपत्रीमुळे मंदी आली आहे. प्लॅस्टिकचा सर्वत्र वाढलेला वापर प्रमुख कारण आहे.प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे पर्यावरणाला असलेला धोका लक्षात घेऊन विविध शहरात प्लास्टिक हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. कारण या प्लॅस्टिकचा पर्यावरणावर परिणाम होऊन मानवी जीवनाला हानिकारक आहे. त्याचा फटका ग्रामीण भागातील नारळाच्या झाडापासून झाप विणणाऱ्या कारागिरांना बसला आहे. मुख्य करून झापाचा उपयोग उपाहारगृहे, रस गुऱ्हाळे हे व्यावसायिक करीत असत. याशिवाय शुभकार्याच्या वेळी मंडपासाठी देखील याचा उपयोग होत असे. पेंढ्याच्या राशी, पावसाळ्यातील वापरण्यात येणारा जळाऊ लाकूडफाटा आणि थेट रेवस मांडवापासून मुरु ड जंजिरापर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावर ठेवण्यात येणाऱ्या नौका झाकण्यासाठी झापांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. तसेच सुपारी सुकविण्यासाठी या झापाचा वापर असे. त्या ठिकाणी प्लॅस्टिक आणि ताडपत्र्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्यामुळे झापांचा खप कमी झाला आहे. त्यामुळे कारागीर रोजगारापासून वंचित झाले. (वार्ताहर)वृक्षाच्या झावळीपासून झाप तयार करण्याच्या व्यवसायावर मंदी आली आहे. प्लॅस्टिकच्या ताडपत्रीच्या वापराचा फटका ग्रामीण भागातील नारळाच्या झाडापासून झाप विणणाऱ्या कारागिरांना बसत आहे.सुपारी सुकविण्यासाठी या झापाचा वापर असे. त्या ठिकाणी ताडपत्र्यांचा वापर होऊ लागला आहे. एक झाप बनविले की आम्हाला पाच रु पये मिळायचे, आम्ही दिवसाला चाळीस ते पन्नास झाप बनवत असू. मालक मात्र एका झापाची विक्र ी ही वीस ते पंचवीसप्रमाणे करीत असे. आता मात्र एका झापाची किंमत ही तीस ते पस्तीस एवढी आहे. मात्र झापाचा वापर आज काही ठरावीकच लोक करीत आहे. - रामचंद्र आगरी, कारागीर
‘झाप’ व्यवसायावर मंदीचे सावट
By admin | Published: March 29, 2017 5:10 AM