- विशेष प्रतिनिधीशहापूर - धेरंडमधील सुप्रसिद्ध जिताडा माशाला आधुनिक मार्केटिंगची जोड देऊन हा जिताडा मासा आता थेट मुंबईच्या बाजारपेठेत पोहोचविण्याकरिता शेतकऱ्यांना संघटित करून नियोजन केले असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. खारेपाटामध्ये दुबार शेतीस उपलब्ध असलेले अंबा खोरेचे ८१ द.ल.घ.मी. पाणी उपलब्ध न करता ते गेली ३० वर्षे धरमतरच्या खाडीत सोडले जात आहे. अशा परिस्थितीत त्याच शेतीतून कायम उत्पादन व उत्पन्न मिळण्यासाठी शेतकºयाने स्वखर्चाने व काही ठिकाणी रोजगार हमी योजनांच्या माध्यमातून मत्स्य शेत तलावाची निर्मिती केली आहे, पण महसूल व कृषी विभागाकडे याची नोंद नाही. त्यामुळे शासनाच्या योजना मत्स्य उत्पादकापर्यंत पोचू शकत नसल्याचे या निमित्ताने भगत यांनी पुढे सांगितले.५०० ते ७०० रुपयेप्रतिकिलो जिताडा मासा विक्रीखारेपाटातील सुप्रसिद्ध व अत्यंत चविष्ट अशा जिताडा या माशाला खारेपाट व त्या जवळच्या शहरी भागातून प्रचंड मोठी मागणी आहे. पाच रुपये मूल्याचे जिताडा माशाचे पिल्लू जून-जुलै महिन्यात शेतात किंवा तलावात सोडून भात कापणीच्या वेळेला शेतातील २०० ते ५०० ग्रॅम वजनाचा तयार झालेला जिताडा मासा पुन्हा तलावात सोडून एक वर्षात हा मासा एक किलोचा होतो. सर्वसाधारणपणे ५०० ते ७०० रुपये किलो दराने जिताडा हा मासा विकला जातो. त्यातून मोठी आर्थिक प्राप्ती खारेपाटातील शेतकºयास होऊ शकते, त्यात सातत्य आणून मोठ्या बाजारपेठेत तो विक्रीकरिता पाठविण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे भगत यांनी पुढे सांगितले.पारंपरिक मत्स्य उत्पादक शेतकºयांच्या माहितीचे संकलनआधुनिक मार्केटिंगचाच एक भाग म्हणून पारंपरिक व नवीन मत्स्य उत्पादक शेतकºयांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे.ज्या शेतकºयांचे मत्स्य तलाव आहेत अशा शेतकºयांनी आपल्या मत्स्य उत्पादकाचे नाव, महसुली गावाचे नाव,तलावाचे क्षेत्र,उपलब्ध माशांचे प्रकार अशी माहिती राजन भगत (७५८८१०५१४८) किंवा प्रा. सुनील नाईक(९८२०९४६१७४) यांच्याकडे द्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.ही माहिती प्राप्त झाल्यानंतर ती संकलित करून खारेपाटातील मत्स्यविक्र ी बचतगट या शेतकºयांबरोबर संपर्क साधून, त्याच वेळेला शहरी भागातील बचतगटांबरोबर संपर्क साधून त्यांची माहिती मत्स्य उत्पादकाला देऊन खरेदी-विक्र ीची नवीन शृंखला तयार केली जाणार असल्याचे भगत यांनी स्पष्ट केले.मत्स्यउत्पादक शेतकºयांना व्हॉट्सअॅप ग्रुप तसेच ई-मेल तयार करून देणे व त्याचा वापर खरेदी-विक्र ीच्या आॅर्डर देण्यासाठी करणे याचे प्रशिक्षण देण्याचे काम देखील श्रमिक मुक्ती दल करणार आहे.
खारेपाटातील जिताडा माशांना आता आधुनिक मार्केटिंगची जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 6:33 AM