जि.प.च्या शाळांमधील पटसंख्या रोडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 01:07 AM2017-07-27T01:07:47+5:302017-07-27T01:07:51+5:30

इंग्रजी माध्यमाच्या आकर्षणामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांची पटसंख्या रोडावत आहे. म्हसळा तालुक्यातील दोन शाळा पटसंख्येअभावी बंद करण्यात आल्या आहेत

Z.P Schools students news | जि.प.च्या शाळांमधील पटसंख्या रोडावली

जि.प.च्या शाळांमधील पटसंख्या रोडावली

Next

अरूण जंगम
म्हसळा : इंग्रजी माध्यमाच्या आकर्षणामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांची पटसंख्या रोडावत आहे. म्हसळा तालुक्यातील दोन शाळा पटसंख्येअभावी बंद करण्यात आल्या आहेत.
शहराचा विकास होत असला तरीही सर्वाधिक लोकवस्ती खेड्यापाड्यात व दुर्गम डोंगराळ भागात आहे अशा परिस्थितीत शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी गाव तिथे शाळा व अंगणवाडी आहे. म्हसळा तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या ११० शाळा असून इयत्ता पहिलीपासून प्रवेश संख्या रोडावली आहे. पालकांनी घरापासून दूर असलेल्या इंग्रजी शाळेला पसंती दिल्यामुळे पटसंख्येत घसरण सुरू आहे. म्हसळा तालुक्यात वीसपेक्षा कमी पट असलेल्या शाळांची संख्या दरवर्षी वाढत जावून या वर्षी तब्बल ५४ इतकी झाली आहे.
पोषण आहार, संगणक प्रशिक्षण, गणवेश बदल यासारखे प्रयोग करून देखील प्राथमिक शाळांना लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नसून ग्रामीण भागातील पालकही शाळेकडे पाठ फिरवत असल्यामुळे भविष्यात प्राथमिक शाळेच्या फक्त इमारतीच शिल्लक राहणार असून किलबिलाट करणाºया विद्यार्थ्यांअभावी शाळा ओस पडणार आहेत.त्यामुळे प्राथमिक शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी केवळ आहार व गणवेश बदल यावरच मर्यादित न राहता ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
११ ते २० पट असलेल्या तालुक्यात २० शाळा असून यामध्ये २८५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ६ ते १० पट असलेल्या १७ शाळांमध्ये १२८ विद्यार्थी आहेत.

इंग्रजी माध्यमाच्या शाळा फी जास्त घेत असल्यातरी प्रत्येक विद्यार्थ्यावर त्यांचे कटाक्षाने लक्ष असते. त्याचप्रमाणे आजच्या युगात इंग्रजी महत्त्वाची झाल्याने मुलांचा या विषयाचा पाया मजबूत होतो
- अनुजा हिरेमठ, पालक

बहुतेक खेडेगावातील मुलांचे पालक कामानिमित्त नोकरीसाठी मुंबई किंवा दुसºया ठिकाणी आहेत त्यामुळे सोबत आपल्या कुटुंबाला घेवून जात असल्याने त्यांच्या विभागातील शाळेची पटसंख्या कमी होते.
- गजानन साळुंखे,
गटशिक्षण अधिकारी, म्हसळा

Web Title: Z.P Schools students news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.