"मी बनियाचा मुलगा आहे, सगळ्याचा हिशेब..."; अमित शाहांचा काँगेसवर जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 03:30 PM2023-09-03T15:30:36+5:302023-09-03T15:31:46+5:30

"मोदीजी दिल्लीतून निधी पाठवतात, राज्यात मात्र..."; शाहांचा अचूक निशाणा

Amit Shah sends strong message to Rajasthan CM Ashok Gehlot over corruption cases | "मी बनियाचा मुलगा आहे, सगळ्याचा हिशेब..."; अमित शाहांचा काँगेसवर जोरदार हल्लाबोल

"मी बनियाचा मुलगा आहे, सगळ्याचा हिशेब..."; अमित शाहांचा काँगेसवर जोरदार हल्लाबोल

googlenewsNext

Amit Shah vs Ashok Gehlot Congress, Rajasthan: राजस्थानमध्ये भाजपच्या दुसऱ्या परिवर्तन यात्रेचा शुभारंभ करण्यासाठी अमित शाह डुंगरपूरला पोहोचले. शाह यांनी मंचावरून राजस्थानच्याकाँग्रेस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. एकीकडे त्यांनी वसुंधरा राजे यांचे कौतुक केले तर दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जातीयवादी धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शाह म्हणाले, "गेहलोत साहेब, तुम्ही तुमच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात काय केले, याचा हिशेब पत्रकार परिषदेत द्या, असे मी आव्हान देतो. वागद भागातील सर्व मंदिरांमधून आम्हाला आशीर्वाद मिळत राहतात. राजस्थानमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी परिवर्तन यात्रा काम करेल. परिवर्तन यात्रेचा टप्पा पूर्ण झाल्यावर गेहलोत सरकारची हकालपट्टी होईल."

बनियाचा मुलगा आहे, हिशेब घेऊनच आलोय!

यूपीए सरकारने 10 वर्षे राजस्थानला काय दिले, असा सवाल अमित शाह यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांना केला. त्यांनी गेहलोत यांच्यावर हल्ला चढवत, "मी एका व्यापाऱ्याचा मुलगा असून पूर्ण हिशेब घेऊन आलो आहे, असे ठणकावले. राजस्थानच्या विकासाच्या मुद्द्यावर अमित शहा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची जोरदार कोंडी करताना दिसले. मोदी सरकारने राजस्थानमध्ये केलेल्या विकासकामांचीही शाह यांनी यादी वाचली. 80,000 शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी जमा करण्यासारखे अनेक मुद्दे त्यांनी जनतेसमोर ठेवले.

"मोदीजी पैसे पाठवतात पण गेहलोत सरकार घोटाळे करतं"

जल जीवन मिशन योजनेतील घोटाळ्यावरून अमित शाह यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, "मोदीजी पैसे पाठवतात पण गेहलोत त्यात घोटाळा करत आहेत. मोदी सरकारने लोकांना कोरोना विरुद्ध लसीकरण मोफत दिले. गेहलोत जी, मी केंद्र सरकारच्या ९ वर्षांच्या कामाचे रिपोर्ट कार्ड सादर करू शकतो, तुम्ही काय करू शकता? आता पत्रकार परिषद घेऊन गेल्या ५ वर्षात काय केले याचा हिशेब देण्याची वेळ आली आहे. तुमचे रिपोर्ट कार्ड सादर करा. राजस्थानमध्ये घोटाळा, भ्रष्टाचार आणि जातीयवादाचे धोरण याशिवाय तुम्ही काहीही केले नाही. याबद्दल जनतेला उत्तर द्या," असे सडेतोड मत शाह यांनी मांडले.

Web Title: Amit Shah sends strong message to Rajasthan CM Ashok Gehlot over corruption cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.