शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

“लोकसभेसाठी भाजपा पूर्णपणे तयार, राजस्थानातील सर्व २५ जागा जिंकू”; भजनलाल शर्मांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 11:01 AM

Rajasthan Lok Sabha Elections 2024: सलग तिसऱ्यांदा भाजपा केंद्रात प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल, असे भजनलाल शर्मा यांनी म्हटले आहे.

Rajasthan Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  लोकसभेच्या ५४३ जागांसाठी १९ एप्रिल ते १ जून या काळात सात टप्प्यांमध्ये मतदानाचा महामहोत्सव पार पडणार आहे. या निवडणुकीचा निकाल ०४ जून रोजी लागणार आहे. राजस्थानात १९ एप्रिल आणि २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी राजस्थानात सर्व जागांवर विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना भजनलाल शर्मा म्हणाले की, भाजपाचा कार्यकर्ता वर्षाचे ३६५ दिवस, महिन्याचे ३० दिवस आणि दिवसाचे २४ तास काम करणारा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजस्थान भाजपा तयार आहे. राजस्थानातील जनतेने गेल्या दहा वर्षांत यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा उल्लेखनीय आणि यशाने भरलेला कार्यकाळ पाहिला आहे. राजस्थानमधील डबल इंजिन सरकारचा गेल्या तीन महिन्यांतील कारभारही पाहिला आहे. आगामी काळात भाजपा सलग तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने केंद्रात सरकार स्थापन करेल, असे भजनलाल शर्मांनी सांगितले.

देशभरात प्रचंड बहुमताने आपले सरकार स्थापन होईल

भाजपा राजस्थानमधील २५ पैकी २५ जागा जिंकेल. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांपेक्षा मोठ्या मताधिक्याने जिंकेल. देशभरात प्रचंड बहुमताने आपले सरकार स्थापन होईल. आमच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या डबल इंजिन सरकारच्या विकास आणि गरीब कल्याण योजनांनी लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे, असे शर्मा यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पुढील आठवड्यात भाजपा आणि काँग्रेस राजस्थानच्या सर्व जागांवर उमेदवार जाहीर करू शकतात, असा कयास आहे. काँग्रेस २० मार्च रोजी दुसरी यादी जाहीर करू शकते. उर्वरित जागांसाठी १८ किंवा १९ मार्च रोजी काँग्रेस सीईसीची बैठक होऊ शकते. भाजप २२ मार्चपर्यंत सर्व उमेदवारांची घोषणा करू शकते. २० मार्चला भाजपाची बैठक होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Rajasthanराजस्थानlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा