काँग्रेसला 60 वर्षांत अशी एकही आदिवासी व्यक्ती मिळाली नाही, जी देशाची राष्ट्रपती बनू शकेल; PM मोदींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2024 09:27 PM2024-04-21T21:27:26+5:302024-04-21T21:28:04+5:30
"भारतीय जनता पक्ष (भाजप) गरीबांच्या कल्याणासाठी समर्पित आहे आणि पूर्ण प्रामाणिकपणे काम करतो. मात्र, काँग्रेसच्या दुकानात भय, भूक आणि भ्रष्टाचारच विकला जातो, असेही मोदी म्हणाले."
आदीवासी कल्ल्यानाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेस पक्षाला आपल्या 60 वर्षांच्या शासन काळात आदिवासी समाजातून येणारी अशी एकही व्यक्ती मिळाली नाही, जी देशाची राष्ट्रपती बनू शकेल. एवढेच नाही, तर भारतीय जनता पक्ष (भाजप) गरीबांच्या कल्याणासाठी समर्पित आहे आणि पूर्ण प्रामाणिकपणे काम करतो. मात्र, काँग्रेसच्या दुकानात भय, भूक आणि भ्रष्टाचारच विकला जातो, असेही मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी आज बांसवाडा येथे भाजप उमेदवार महेंद्रजीत मालवीय यांच्या समर्थनार्थ एका प्रचार सभेला संबोधित करत होते. ते म्हणाले, ”आदिवासी समाजात क्षमता नव्हती का? जरा काँग्रेसच्या मानसिकतेचा विचार करा. 2014 मध्य आपण या सेवकाला आर्शीवाद दिला. आज या देशाची प्रथम नागरिक, देशाची राष्ट्रपती, आदिवासी समाजातील एक मुलगी आहे. हीच खरी भागीदारी आहे.”
मोदी म्हणाले, तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात पहिल्यांदाच आदिवासी समाजासाठी एक स्वतंत्र मंत्रालय तयार करण्यात आले. स्वतंत्र बजेट तयार केले होते. कोट्यवधी आदिवासी मुलं अणि मुलींपैकी काँग्रेसला 60 वर्षांत असं कुणीही मिळालं नाही जे देशाचा राष्ट्रपती बनू शकेल?”
“आज भारतात स्थिर आणि मजबूत सरकार असणे अत्यंत आवश्यक आहे. एक असे सरकार, जे सीमांचे संरक्षण करू शकेल आणि गरज पडल्यास, पाताळातूनही शत्रू शोधून त्याचा नाश करू शकेल. एवढेच नाही तर, देशाला एका अशा सरकारची आवश्यकता आहे, जे महिला, शेतकरी, गरीब, वंचित, आदिवासी आणि मागास, अशा सर्वच घटकांना सन्मान आणि समृद्धीकडे घेऊन जाईल, असेही मोदी म्हणाले."