राजस्थान काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद असल्याचे समोर आले होते. दुसरीकडे आता राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका सुरू आहेत. आज भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला, काँग्रेसनेही निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. सीएम अशोक गेहलोत आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्यात आरोप-प्रत्यारोप गेल्या काही दिवसांपूर्वी सुरू होते. यामुळे काँग्रेसमध्येच अंतर्गत वाद सुरू असल्याचे बोलले जात आहे. आज हे दोन्ही नेते असल्याचे एका व्हिडिओत दिसले, यारुन भाजपने काँग्रेसवर टीका केली.
"हे इतकं सरळ चित्र नाही.."; जरांगे पाटलांच्या आंदोलनावर राज ठाकरेंना वेगळीच शंका
गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जयपूरमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासोबत हजेरी लावली.यावेळी गांधी यांनी आम्ही एकत्र आहोत असं म्हटले राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर भाजपने म्हटले की, हे नाटक आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, हे फोटोशूट आहे. या लोकांनी काय केले नाही? त्यांच्या पोस्टरमध्ये राहुल गांधीचा फोटोही नव्हता. राजस्थानमध्ये काँग्रेसचे काहीही होणार नाही हे राहुल गांधींना माहीत आहे.
राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच जिंकेल, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी केला. आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहू. या निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होईल. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटही होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी आज तारानगर, नोहर आणि सादुलशहर (श्रीगंगानगर) येथे निवडणूक रॅलींना संबोधित करणार आहेत. वसुंधरा राजे सरकारच्या काळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराबाबत सचिन पायलट यांनी अशोक गेहलोत यांच्यावर कारवाई केली नसल्याचा आरोप केला होता. या कारणावरून दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर निशाणा साधला. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन्ही नेत्यांच्या अनेकवेळा बैठका घेतल्या.
बैठकीनंतर काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी एका गोष्टीचा पुनरुच्चार केला की आपण एक आहोत. राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होत आहे. सध्या राज्यात काँग्रेसचे सरकार आहे.