कोटा – १७ वर्षीय मनिष प्रजापत जो IIT-JEE परीक्षेची तयारी करत होता त्यानं हॉस्टेलमध्ये पंख्याला लटकून गळफास घेतला. मनिष इंजिनिअरींगच्या तयारीसाठी आजमगडहून कोटाला आला होता. ज्यादिवशी त्याने हे टोकाचे पाऊल उचललं त्याच्या काही क्षणापूर्वी त्याचे वडील कोटामध्ये त्याच्यासोबत होते. जसं वडिलांनी कोटाहून घरी जाण्यासाठी ट्रेन पकडली तसं मनिषनेही या जगाचा निरोप घेतला.
यूपी-बिहारहून बरेच विद्यार्थी भविष्याचे स्वप्न पाहत कोटा इथं शिक्षणासाठी येतात. आई वडीलही मुलांच्या शिक्षणासाठी काहीही कमी पडू देत नाहीत. मग कोटा येथे आल्यानंतर मुलांच्या मनाची घालमेल का होतेय? अलीकडेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकाने सुसाईड केल्याची घटना घडली. यूपीच्या मनजोत सिंहने कोटा येथे आत्महत्या करून जीव दिला.
सॉरी..हॅप्पी बर्थडे पापा
मनजोतने भिंतीवर तीन नोट्स चिकटवल्या होत्या, Sorry, मी जे काही केले माझ्या मर्जीने केले आहे. प्लीज माझ्या मित्रांना आणि पालकांना त्रास देऊ नका. यानंतर पुढच्या चिठ्ठीत हॅप्पी बर्थडे पापा असे लिहून त्याने हार्ट इमोजी काढला. हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले.
कोटा येथे राहणाऱ्या किर्ती नामानं सांगितले की, मी राजस्थान बोर्डातून शिक्षण घेतले आहे. ८५ टक्के गुण मिळवल्यानंतर मी स्पर्धा परीक्षांचीही तयारी सुरू केली. बोलता बोलता तिने तिथे मुले आत्महत्या का करतात याचे खरे कारण सांगितले. तुम्ही पालक असाल किंवा तुम्हाला स्वतः कोटा किंवा इतर कोणत्याही शहरात अभ्यासासाठी जायचे असेल. किंवा घरीच अभ्यास करत असताना यावर गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे असं तिने सांगितल.
मुलं स्वत:ला हुशार मसूजन कोट्यात येतात, पण कधी इंग्रजी-हिंदी माध्यमाचा अभाव, कधी स्पष्टवक्तेपणा, कधी तडफदारपणा, काही मुलं स्वत: दडपणाखाली जातात. कोटामध्ये एक, दोन किंवा १०-२० नव्हे तर अनेक संस्था आहेत. येथे विद्यार्थ्यांचा मेळा भरवला जातो. वर्ग गर्दीने फुलले जातात. अशा परिस्थितीत स्वत:वरील विश्वास कमी पडतो. शिक्षकही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे मुलांच्या समस्या वाढतात असंही किर्ती म्हटलं.