लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर: राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच जोर धरत आहे. कॉंग्रेस आणि भाजपमध्ये प्रमुख लढत असलेल्या राजस्थानमध्ये ध्रुवीकरणाचा विषयही चर्चेत आला आहे. भाजपने ४, तर काॅंग्रेसने एका धर्मगुरुला रिंगणात उतरविले असून त्यापैकी दोघांसाठी निवडणुकीचा पेपर सोपा, तर तिघांसाठी कठीण असल्याचे म्हटले जात आहे.
देवासींना संधीसिरोही मतदारसंघात भाजपने रेबारी समाजाचे संत ओटाराम देवासी यांना तिकीट दिले असून कॉंग्रेसकडून विद्यमान आमदार संयम लोढा रिंगणात आहे. मतदारंसघात भाजपकडून बंडखोर उमेदवार असला, तरी अँटी-इन्कम्बंसीमुळे कॉंग्रेसबाबत नाराजीचे वातावरण आहे.
यांना पेपर कठीण भाजपने तिजारा मतदारसंघात खासदार बाबा बालकनाथ यांनी रिंगणात उतरविले आहे. कॉंग्रेसकडून त्यांच्याविरोधात इमरान खान लढत आहे. मतदारसंघात यादव, गुर्जर तसेच एससी मतदारांची अधिक संख्या असून बालकनाथ यांच्यासाठी ही लढत सोपी नसणार आहे.
सहानुभूतीचा फायदा भाजपने पोखरण मतदारसंघात महंत प्रतापपुरी यांना, तर कॉंग्रेसने मुस्लिम धर्मगुरू सालेह मोहम्मद यांनी तिकीट दिले आहे. यंदा सालेह यांच्याबाबत काही प्रमाणात नाराजीचे वातावरण आहे, तर प्रतापपुरी यांच्याबाबत सहानुभूती आहे. एससी मतदारांवर निकाल अवलंबून आहे.
काटेरी लढत भाजपने हवामहलमध्ये हाथोज धामचे धर्मगुरू बालमुकुंदाचार्च यांना तिकिट दिले. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसकडून महेश जोशी रिंगणात आहे.सुरुवातीला कॉंग्रेस नेत्याने बंडखोरी केल्याने बालमुकुंदाचार्य यांना ही लढत सोपी झाली होती. मात्र, बंडखोराने अर्ज मागे घेतल्याने चित्र बदलले आहे.