४ लाख सरकारी नोकऱ्या; शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचे निर्व्याज कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 06:16 AM2023-11-22T06:16:51+5:302023-11-22T06:17:26+5:30

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि जाहीरनामा समितीचे अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी यांनी काँग्रेस मुख्यालयात हा सार्वजनिक जाहीरनामा प्रसिद्ध केला.  

Four lakh government jobs; Congress manifesto, Rs 2 lakh interest free loan to farmers | ४ लाख सरकारी नोकऱ्या; शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचे निर्व्याज कर्ज

४ लाख सरकारी नोकऱ्या; शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचे निर्व्याज कर्ज

जयपूर : राजस्थानमधील सत्ताधारी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला. ज्यामध्ये शेतकऱ्यांना २ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याचे आणि स्वामिनाथन समितीच्या शिफारसीनुसार किमान आधारभूत किंमत कायदा आणण्याचे आश्वासन दिले. याशिवाय चार लाख सरकारी नोकऱ्यांसह पाच वर्षांत दहा लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासनही काँग्रेसने  दिले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि जाहीरनामा समितीचे अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी यांनी काँग्रेस मुख्यालयात हा सार्वजनिक जाहीरनामा प्रसिद्ध केला.  लहान व्यापारी आणि दुकानदारांना ५ लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज देण्यासाठी व्यापारी क्रेडिट कार्ड योजना सुरू करणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. याशिवाय राज्यात जात जनगणना करण्याचे आणि मोफत आरोग्य विमा संरक्षणाची रक्कम ५० लाखांपर्यंत वाढविण्याचे आश्वासनही जाहिरनाम्यात देण्यात आले आहे.

प्रमुख आश्वासने

nचिरंजीवी आरोग्य विम्याची रक्कम २५ लाखांवरून ५० लाख रुपये.  
nकुटुंबातील एका महिला सदस्याला वर्षभरात १०,००० रुपये मानधन.
nचार लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्यात येतील. 
nपाच वर्षांत एकूण १० लाख तरुणांना रोजगार दिला जाणार आहे. 
nऑटाे, टॅक्सी चालकांना ‘गिग’ श्रेणीमध्ये आणणार.
nअपत्यहीन दाम्पत्यांसाठी आयव्हीएफ नॅशनल पॅकेज चिरंजीवी याेजनेत आणणार.
nआरटीईचा इयत्ता बारावीपर्यंत विस्तार करणार.
nराजीव गांधी शिष्यवृत्तीचा विस्तार करणार.सर्व गावांमध्ये इंटरनेट देणार.

राज्यात काँग्रेसचे सरकार येणार : खरगे

यावेळी खरगे यांनी राजस्थान हा काँग्रेसचा मजबूत बालेकिल्ला असल्याचे सांगत, यावेळी राज्यात पुन्हा काँग्रेसचेच सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला. 

अशोक गेहलोत म्हणाले की, राजस्थानची अर्थव्यवस्था या वर्षाच्या अखेरीस १५ लाख कोटी रुपयांची होईल आणि २०३० पर्यंत ती ३० लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

Web Title: Four lakh government jobs; Congress manifesto, Rs 2 lakh interest free loan to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.