जयपूर : भाजपने सुरू केलेल्या आरोग्य योजना, कायदा-सुव्यवस्था इत्यादी कॉंग्रेसच्या काळात गायब झाल्या. अशी किमया एखादा जादूगारच करू शकतो, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गेहलोत सरकारवर केली.
‘काॅंग्रेसने राज्याचे नुकसान केले’- राजस्थानमध्ये मागील ५ वर्षांत अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारने राज्याचे नुकसान करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. राजस्थानमधील सरकार हे सर्वांत भ्रष्ट सरकार आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. कुचामन येथील प्रचारसभेत ते बोलत होते.
काँग्रेसच्या ‘गॅरंटी यात्रे’ला सुरुवात
काँग्रेस पक्षाने मंगळवारपासून राजस्थान ‘गॅरंटी यात्रे’ला जयपूरमधून सुरुवात केली. त्यामाध्यमातून, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी घोषित केलेल्या ७ घोषणा लोकांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री गेहलोत, प्रभारी सुखजिंदर सिंह रंधावा यांनी मंगळवारी मोती डुंगरी गणेश मंदिरात पूजा करून यात्रेला सुरुवात केली. अशी यात्रा राज्यातील सर्व २०० विधानसभा मतदारसंघात काढली जाणार आहे.काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांमध्ये कर्त्या महिलेला वार्षिक १० हजार, ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडर, २ रुपये प्रतिकिलो दराने शेणखरेदी, जुनी पेन्शन योजना, विद्यार्थ्यांना माेफत लॅपटॉप आदींचा समावेश आहे.