नागाैर : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या लाेकसभा निवडणुकीत काँग्रेसने नाथूराम मिर्धा यांचा पराभव करण्यासाठी रामनिवास मिर्धा यांना तिकीट दिले हाेते. मिर्धा कुटुंबातील दाेन दिग्गजांमध्ये झालेल्या लढतीत नाथूराम यांचा पराभव झाला हाेता. आता ३९ वर्षांनी याच कुटुंबातील दाेन नेते पुन्हा एकमेकांविराेधात उभे ठाकले आहेत. मिर्धा कुटुंबातील काका आणि पुतणीमध्ये नागाैर येथे लढत हाेत आहे.
रामनिवास मिर्धा यांचे पुत्र हरेंद्र मिर्धा यांना काँग्रेसने, तर भाजपने नाथूराम मिर्धा यांची नात ज्याेती यांना उमेदवारी दिली आहे. माजी खासदार असलेल्या ज्याेती या दाेन महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत. मिर्धा कुटुंबातील एकूण चार जण नागाैर जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत निवडणूक लढवीत आहेत. काँग्रेसने डेगाना येथून विजयपाल आणि खिवंसर येथून तेजपाल यांना उमेदवारी दिली आहे.
दाेन्ही कुटुंबांतील नाते चांगलेकाका-पुतणी लढत जरी असली, तरी काैटुंबिक संबंध चांगले आहेत. रामनिवास आणि नाथूराम यांचे नाते खूप चांगले हाेते.मात्र, राजकीय परिस्थितीमुळे दाेघांनी एकमेकांविराेधात निवडणूक लढविली. ज्याेती या भाजपमध्ये का गेल्या, हे त्यांनाच विचारायला हवे, असेहरेंद्र मिर्धा म्हणाले.
हा फॅक्टर निर्णायकअपक्ष उमेदवार हबीबुर्रहमान हे किती मते घेतात, यावर गणित अवलंबून आहे. मात्र, नागाैरमधील मुस्लीम मतदार त्यांच्याऐवजी हरेंद्र यांना साथ देईल. जाट समाजाची मतेही काँग्रेसला मिळतील, असा अंदाज स्थानिक मतदार बळीराम चाैधरी यांनी व्यक्त केला.