कोटा (राजस्थान): भाषा, जाती व प्रादेशिक वाद बाजूला ठेवून हिंदू समाजाने आपल्या सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली. भारत हे हिंदू राष्ट्र असल्याचा दावा राजस्थानातील बारान येथे आयोजित 'स्वयंसेवक एकत्रीकरण' कार्यक्रमाला संबोधित करताना भागवत यांनी केला.
हिंदू हा शब्द नंतर आला असला तरी प्राचीन काळापासून आपण येथे राहत आहोत. हिंदू सर्वांना सामावून घेतात, सातत्याने संवाद साधत ते एकोप्याने राहत असल्याचे ते म्हणाले. आचरणातील शिस्त, देशाप्रति कर्तव्य व ध्येयाप्रति समर्पण हे आवश्यक गुण आहेत.
केवळ व्यक्ती किंवा त्यांच्या कुटुंबांमुळे समाज बनत नाही. तर व्यापक चिंतेचा विचार करून आध्यात्मिक समाधान प्राप्तीतून समाज बनतो. संघाची कार्यपद्धती विचारांवर आधारित आहे. ही एक वेगळी संस्था असून तिची मूल्ये गटनेत्यापासून ते स्वयंसेवक, समाजातील प्रत्येकाशी निगडित आहेत. असे भागवत म्हणाले.