राजस्थानात निवडणुकीचा ट्रेंड मोडला तर अशोक गहलोत नव्हे तर 'हा' असेल खरा जादूगर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 05:05 PM2023-11-27T17:05:10+5:302023-11-27T17:06:18+5:30
हा व्यक्ती सामान्य नसून याच्याच बळावर काँग्रेसनं कर्नाटकात विजय मिळवला
जयपूर - राजस्थानात ३ डिसेंबर विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल येणार आहेत. या निकालाबाबत राजकीय पक्षांना उत्सुकता लागून राहिली. राज्यात आमचेच सरकार पुन्हा येईल असा दावा काँग्रेस सातत्याने करत आहे.अशातच जर राजस्थानात मागील २० वर्षांचा निवडणूक ट्रेंड मोडला तर यामागे राजस्थानचे जादूगार अशोक गहलोत यांच्या जादूऐवजी दुसऱ्या एका व्यक्तीचा मोठा वाटा असेल. जर राजस्थानात काँग्रेस सरकार आले तर या व्यक्तीची जादू कुणीही नाकारणार नाही. हा तोच व्यक्ती आहे ज्याच्या जीवावर काँग्रेस पुन्हा एकदा राजस्थानात सत्ता बनवण्याचं स्वप्न पाहतेय.
हा व्यक्ती सामान्य नसून याच्याच बळावर काँग्रेसनं कर्नाटकात विजय मिळवला. काँग्रेसच्या या थिंकटँकचे नाव आहे नरेश अरोडा. हे नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य झाले असेल. नरेश अरोडा आहे कोण? ज्याच्या जीवावर काँग्रेसनं कर्नाटक जिंकले आणि आता राजस्थानात पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याची तयारी करत आहे. कर्नाटक निवडणुकीत विजय मिळाल्यापासून काँग्रेसमध्ये नवचैतन्य पसरले आहे. त्यामुळे काँग्रेस या ५ राज्यात चांगली कामगिरी करेल असा विश्वास अनेकांनी वर्तवला. कर्नाटकात निवडणूक जिंकवणारा थिंकटँक नरेश अरोडा आहेत. जे डिझाईन बॉक्सचे संस्थापक आहेत. काँग्रेसनं कर्नाटकनंतर राजस्थानमध्येही त्यांच्यावर जबाबदारी टाकली.
काँग्रेसलाही नरेश अरोडा यांच्या रणनीतीवर बराच विश्वास आहे. कर्नाटक निवडणुकीपूर्वी काँग्रेसनं मॅनेजमेंट कंपनी डिझाईन बॉक्सला त्यांचे काम दिले होते. नरेश अरोडा यांनी काँग्रेसच्या विजयासाठी कर्नाटकात मॅनेजमेंट केले होते त्याचा निकाल काय लागला हे सर्वांनीच पाहिले. कर्नाटक निवडणुकीतील विजयाचे श्रेय डिके शिवकुमार आणि सिद्धरमैया यांना दिले जाते. परंतु प्रत्यक्ष हा कारनामा नरेश अरोडा यांच्या मॅनेजमेंट कंपनीने केले. डिझाईन बॉक्सचे संचालक नरेश अरोडा यांनी कर्नाटक निवडणुकीत म्हटलं होते की, मागील २ वर्षापासून आम्ही कर्नाटकात काम करतोय. आम्ही सर्व्हेच्या बळावर डिके शिवकुमार यांना काँग्रेस १४० जागांवर जिंकू शकते असा अंदाज दिला होता. विजयी झालेला नंबर हा त्याच्या जवळपास आहे. आम्ही हा अंदाज घरात बसून लावला नाही. ग्राऊंड पातळीवर आम्ही मेहनत घेतोय असं त्यांनी म्हटलं होते.
कर्नाटकानंतर काँग्रेसमध्ये उत्साह होता आणि त्यामुळेच नरेश अरोडा यांच्यावरील विश्वासही वाढला. काही दिवसांपूर्वी अशोक गहलोत आणि त्यांच्या टीमची नरेश अरोडा यांच्यासोबत बैठक झाली. त्याशिवाय नरेश अरोडा हे भारत जोडो यात्रेच्या काळात सचिन पायलट यांच्यासोबतही काम केले.राजस्थानच्या निवडणुकीत नरेश अरोडा यांची सक्रीय भूमिका राहिली. राजस्थानातील निवडणूक आव्हानात्मक होती. काँग्रेसनं मॅनेजमेंटनुसार काम केले आहे. परंतु आतापर्यंत राजस्थानचा ट्रेंड पाहिला तर एकदा भाजपा, एकदा काँग्रेस सत्तेत येते. परंतु यंदा काँग्रेस आणि नरेश अरोडा असा दावा करतंय की, राजस्थानात गेल्या दशकापासून सुरू असलेला हा इतिहास यंदा बदलेल. राजस्थानात पुन्हा काँग्रेसचं सरकार येईल. त्यामुळे ३ डिसेंबरच्या निकालात जनतेचा कौल कुणाला मिळणार हे पाहणे गरजेचे आहे.