जयपूर : राजस्थान विधानसभा निडणुकीच्या प्रचाराला चांगलाच जोर आला आहे. कॉंग्रेस-भाजपसह अन्य पक्षही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राजस्थानमध्ये प्रामुख्याने कॉंग्रेस व भाजप लढत होत आहे. राजस्थानातील एकूण २०० मतदारसंघांपैकी ७ मतदारांसंघांमध्ये महिला उमेदवारांमध्येच लढत होणार आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी महिला आरक्षण नसतानाही ही लढत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. महिलांनी प्रचारात झोकून दिले आहे.
सत्तांतराची परंपरा राजस्थानमध्ये मागील ३० वर्षांपासून दर ५ वर्षांनी विधानसभेत सत्तांतर होण्याची परंपरा आहे. पाच वर्षे कॉंग्रेसला तर पुढची पाच वर्षे भाजपला सत्ता मिळत आली आहे. ही परंपदा या खेपेला कायम राहणार का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस नेते प्रचारात बदल होणार यावर भर देताना दिसत आहेत.
मतदारसंघ भाजप कॉंग्रेसकामा नौक्षम चौधरी जाहिदा खानजायल मंजू बाघमार मंजू देवी मेघवालसादुलपूर सुमित्रा पुनिया कृष्णा पुनियाहिंडोन राजकुमारी जाटव अनिता जाटव अनुपगड संतोष बावरी शिमला नायकअजमेर (द) अनिता भदेल द्रौपदी कोली भोपालगढ कमसा मेघवाल गीता बरवड