कोचिंग सेंटर कोटामध्ये यंदा काट्याची लढत; ओम बिर्लाविरोधात प्रल्हाद गुंजल यांच्यात टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 11:11 AM2024-04-24T11:11:47+5:302024-04-24T11:12:53+5:30
गुंजल हे कधीकाळी ओम बिर्ला यांचे सहकारी हाेते. गुंजल हे गुर्जर नेते आहेत त्यामुळे ही मते त्यांच्या पारड्यात पडू शकतात.
विलास शिवणीकर
कोटा : कोचिंग सेंटर म्हणून देशात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या राजस्थानातील कोटामध्ये सध्या चर्चा फक्त राजकारणाचीच आहे. भाजपचे उमेदवार आणि मावळत्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला या मतदारसंघातून लढत आहेत. भाजपमधून आलेल्या प्रल्हाद गुंजल यांना काँग्रेसने येथून उमेदवारी दिली आहे.
गुंजल हे कधीकाळी ओम बिर्ला यांचे सहकारी हाेते. गुंजल हे गुर्जर नेते आहेत त्यामुळे ही मते त्यांच्या पारड्यात पडू शकतात. अल्पसंख्यांक, मीणा आणि एससी, एसटी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरु आहे. गत १५ वर्षात प्रथमच कोटामध्ये काट्याची लढाई पहायला मिळत असल्याचे अनेक नेते सांगत आहेत. तथापि, भाजपचे कार्यकर्त्यांचे मोठे नेटवर्क ओम बिर्ला यांना विजयाकडे घेऊन जाऊ शकते.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
काँग्रेस पक्ष ओम बिरला यांना दहा वर्षांचा हिशेब मागत आहे. ओम बिरला म्हणतात की, या निवडणुकीत विरोधक ज्या प्रकारे भाषेचा वापर करत आहेत आणि खोटे आरोप करत आहेत असा प्रकार आपण आपल्या राजकीय जीवनात पाहिला नाही. मोदींची गॅरंटी आणि राम मंदिराचा
मुद्दा या बिरला यांच्यासाठी येथे जमेच्या बाजू आहेत.