"एकत्र लढू, सरकार बनवू"; सचिन पायलट यांचा टोंक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 11:38 AM2023-11-01T11:38:33+5:302023-11-01T11:39:06+5:30
मागील निवडणुकीत पायलटांनी भाजपच्या उमेदवाराचा ५४ हजार मतांनी केला होता पराभव
लोकमत न्यूज नेटवर्क, जयपूर: माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी टोंक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी जाेरदार शक्तिप्रदर्शन केले. मागील निवडणुकीत पायलट यांनी भाजप उमेदवार युनूस खान यांचा ५४ हजार मतांनी पराभव केला होता. एकत्र लढू आणि सरकार स्थापन करु, असे यावेळी पायलट म्हणाले.
पायलट यांचा घटस्फोट
- सचिन पायलट यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात त्यांनी घटस्फोटित असल्याचा उल्लेख केला आहे.
- नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांची मुलगी सारा हिच्याशी सचिन यांनी २००४ मध्ये विवाह केला होता.
- २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांच्यात मतभेद झाल्याची चर्चा रंगली होती.
भाजपचे १९, तर काँग्रेसचे ७ बालेकिल्ले
- विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने आता निवडणुकीला खरी रंगत आली आहे.
- विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने आता निवडणुकीला खरी रंगत आली आहे.
- मागील ३० वर्षांपासून या पक्षांनी मतदारसंघांवर मजबूत पकड निर्माण केली आहे. राज्यात २०० मतदारसंघ आहेत.
भाजपचा गड
- चुरू राजेंद्रसिंह राठोड
- विराटनगर फुलचंद भिंडा
- जैतारण पुष्पेंद्र सिंह
- ब्यावर शंकरसिंह रावत
- अजमेर वासुदेव देवनानी
काँग्रेसचा गड
- सरदार शहर भंवरलाल शर्मा
- लछमनगड गोविंद सिंह डोटासरा
- दांतारामगड वीरेंद्र सिंह
- सरदारपूर अशोक गेहलोत
- गुढामालानी हेमाराम चौधरी
२०० सदस्यसंख्या- असलेल्या राजस्थान विधानसभेसाठी २५ नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. २०१९ - २०२३ या कालावधीत विधानसभेच्या अधिवेशनांमध्ये झालेल्या बैठका, विधेयकांवरील चर्चा व मंजुरी, विविध विषयांवरील चर्चा, याबाबतचा हा लेखाजोखा...