नव्या भारताच्या निर्मितीसाठी भारत कटिबद्ध आहे, असे म्हणत, जगत पिता ब्रह्मा, भक्त शिरोमणि मीरा बाई आणि वीर तेजाजींसह इतर काही स्थानिक लोक देवतांचे स्मरण करत, पुष्करसोबत कमळाचे जुनेच नाते आहे. आजच्याच दिवशी भाजपची स्थापना झाली होती आणि भाजपचे चिन्ह देखील कमळच आहे. असे मोदी यांनी म्हटले आहे. ते भाजपच्या स्थापना दिनानिमित्त आज राजस्थानातील ऐतिहासिक तीर्थनगरी पुष्कर येथे बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण भाषण महिला आणि मुलींवर केंद्रित होते. यावेळी पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी उज्जवला योजनेपासून ते जन धन खात्यांपर्यंत महिलांशी संबंधित जवळपास सर्वच योजनांवर भाष्य केले. मुलींच्या यशाचे कौतुक केले. त्यांनी महिला हितासाठी केलेली सर्व कामे एक-एक करून जनतेसमोर मांडली आणि लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा आशीर्वाद मागितले.
देशाला फार पुढे न्यायचे आहे -हे तर केवल ट्रेलर आहे, याचाही मोदींनी पुरुच्चार केला. आपल्याला देशाला फार पुढे न्यायचे आहे. 2024 ची निवडणूक ही सामान्य निवडणूक नाही. वर्षानुवर्षे आघाडीची सरकारे चालवली. काँग्रेसच्या काळात शेतकरी, मजूर, महिला आणि तुरुणांचे जगणे अवघड झाले होते. जेथे काँग्रेस आहे, तेथे विकास होऊ शकत नाही, असे मोदी म्हणाले. एवढेच नाही तर, मोदी देशातील गरीबांसोबत एखाद्या पहाडा प्रमाणे उभा आहे. मोदीने 10 वर्षांत यांच्या लुटीच्या दुकानांचे शटर पाडले आहे.
‘एक तो करेला ऊपर से नीम चढा’ -काँग्रेसवर हल्ला चढवत मोदींनी म्हणाले, त्यांच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगची छाप आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात भारताचे तुकडे करण्याचा वास येत आहे. जी चूक मुस्लीम लीगने स्वातंत्र्याच्या वेळी केली होती, तीच चूक काँग्रेसने केली आहे. काँग्रेसकडे ना सिद्धांत उरले आहेत ना धोरण. काँग्रेसच्या बाततीत बोलले जाते की, ‘एक तो करेला ऊपर से नीम चढी’, एक तर घराणेशाही, वरून भ्रष्टाचारी पक्ष.