भाजपने भाकरी फिरविली; आता आव्हान लोकसभेचे, कमळाचा विजयरथ रोखणार का हात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2024 10:17 AM2024-03-11T10:17:48+5:302024-03-11T10:21:17+5:30

लोकसभा निवडणुकीत २५ जागा राखण्याचे आव्हान पक्षापुढे आहे. 

now the congress challenge of the lok sabha 2024 will the bjp be stopped | भाजपने भाकरी फिरविली; आता आव्हान लोकसभेचे, कमळाचा विजयरथ रोखणार का हात?

भाजपने भाकरी फिरविली; आता आव्हान लोकसभेचे, कमळाचा विजयरथ रोखणार का हात?

विलास शिवणीकर, लोकमत न्यूज नेटवर्क, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असताना भाजप आणि काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीतील १५ उमेदवार हे राजस्थानमधील आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सर्व २५ जागांवर भाजपचा विजय झाला होता. यंदा या जागा कायम ठेवण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. तर, भाजपचा विजयरथ रोखण्याचे आव्हान काँग्रेसपुढे आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री करत भाकरी फिरविली खरी; पण, आता लोकसभा निवडणुकीत २५ जागा राखण्याचे आव्हान पक्षापुढे आहे. 

राजस्थानमधून भाजपने ज्या प्रमुख उमेदवारांना रिंगणात उतरविले आहे, त्यांत अर्जुन राम मेघवाल (बिकानेर), भूपेंद्र यादव (अलवर), गजेंद्र सिंह शेखावत (जोधपूर), कैलाश चौधरी (बाडमेर), ओम बिरला (कोटा) यांचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजस्थानात भाजपने विजय मिळवत काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली.

काँग्रेसची छोट्या पक्षांसोबत आघाडी

छोट्या पक्षांसोबत आघाडी करून काँग्रेस ताकद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्यात भाकप, भारतीय आदिवासी पार्टी आणि हनुमान बेनिवाल यांच्याशी काँग्रेसची चर्चा सुरू आहे व त्यावर शिक्कामोर्तब होण्याचीही शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीतही भारतीय आदिवासी पार्टीने आदिवासी जागांवर काँग्रेसशी आघाडी करण्याचा प्रयत्न केला होता; पण काँग्रेसने ते मान्य केले नाही आणि बहुतांश आदिवासी जागांवर भाजपने निवडणूक जिंकली होती. ही चूक आता सुधारण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होताना दिसत आहे. 

लोकसभेला सलग दोनदा काँग्रेसचा पराभव 

लोकसभेच्या २०१४ आणि २०१९ अशा दोन निवडणुकांत राजस्थानात काँग्रेसला यश मिळविता आलेले नाही. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने राजस्थानात सत्ता मिळविली होती. अशोक गेहलोत यांनी पाच वर्षे मुख्यमंत्रिपद भूषविले. तथापि, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवत राज्यात सत्ता स्थापन केली आणि भजनलाल शर्मा मुख्यमंत्री झाले.

 

Web Title: now the congress challenge of the lok sabha 2024 will the bjp be stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.