लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : राजस्थानमधील विधानसभेच्या २०० जागांसाठी २५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी राज्यात मागील काही दिवसांपासून धडाडत असलेल्या प्रचाराच्या तोफा आज गुरुवारी शांत झाल्या. प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत होणार असल्याने दोन्ही पक्षांनी सत्तेत येण्यासाठी अनेक आश्वासने दिली तसेच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही केले.
गेहलोत, पायलट यांच्या सभामुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जोधपूर येथील धानमंडी येथे, तर माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी झालावाड जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ सभेला संबोधित केले.
अमित शाह, योगी, शिंदे यांचा रोड शो राजस्थानमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निम्बा हेडा आणि नाथद्वारा येथे रोड शो केला. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी यांनीही रोड शो केले.
कोणते मुद्दे चर्चेत?
n५ वर्षात राबविलेल्या कल्याणकारी योजना; सत्तेत आल्यास सात योजनांची गॅरंटीnभाजप सरकारच्या काळात देशात वाढली महागाई; सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन.
nकाँग्रेसच्या कल्याणकारी योजना केवळ कागदोपत्री; पेपरलीक, लालडायरी हे कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराचे प्रतीकnकॉंग्रेसच्या घराणेशाही, तुष्टीकरणामुळे राज्याची हानी; भ्रष्टाचाराची चौकशी करणार