सचिन पायलट यांच्या 'त्या' ३ मागण्या, गेहलोत यांच्या विरोधात पुन्हा एकदा मोर्चेबांधणी सुरू करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 09:38 AM2023-06-01T09:38:02+5:302023-06-01T09:39:12+5:30
पदयात्रेदरम्यान सचिन पायलट यांनी ३ मागण्या मांडल्या होत्या आणि त्या १५ दिवसात म्हणजे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचा अल्टिमेटम दिला होता.
गेल्या काही दिवसापासून राजस्थान काँग्रेसमध्ये मोठा गोंधळ सुरू असल्याचे दिसत आहे. सचिन पाटलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर आरोप केले होते. गेल्या दोन दिवसापूर्वी काँग्रेसने हा वाद मिटवल्याचा दावा केला होता. पण, सचिन पायलट यांनी पुन्हा एकदा गेहलोत सरकारविरोधात कठोर भूमिका दाखवली आहे. पायलट यांनी गेहलोत सरकारकडे केलेल्या त्यांच्या मागण्यांबाबत मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. काही काळापूर्वी, वसुंधरा राजे सरकारमधील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कारवाईच्या मागणीसाठी पायलट यांनी एक दिवसीय उपोषण केले तेव्हा हा संघर्ष अधिक तीव्र झाला. यानंतर सचिन पायलट यांनी पत्रकार परिषदेत नाव घेऊन थेट अशोक गेहलोत यांच्यावर निशाणा साधला. भ्रष्टाचारप्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी त्यांनी ५ दिवसांची पदयात्राही केली होती.
पदयात्रेदरम्यान सचिन पायलट यांनी ३ मागण्या मांडल्या होत्या आणि त्या १५ दिवसात ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचा अल्टिमेटम दिला होता. पायलट बुधवारी त्यांचा विधानसभा मतदारसंघ टोंक येथे पोहोचले. सचिन पायलट यांनी आपल्या मागण्यांबाबत गेहलोत सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा बुधवारी शेवटचा दिवस होता, असं म्हटले होते.
पदयात्रेदरम्यान सचिन पायलट यांनी ३ मागण्या मांडल्या होत्या आणि त्या १५ दिवसात ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचा अल्टिमेटम दिला होता. पायलट बुधवारी त्यांचा विधानसभा मतदारसंघ टोंक येथे पोहोचले. सचिन पायलट यांनी आपल्या मागण्यांबाबत गेहलोत सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा बुधवारी शेवटचा दिवस होता, असं म्हटले होते.
वसुंधरा राजे सरकारवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी व्हावी, पेपर फुटीमुळे आर्थिक नुकसान झालेल्या मुलांना योग्य मोबदला देण्यात यावा, सरकारी नोकऱ्यांमधील भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी या तीन मागण्या सचिन पायलट यांनी केल्या होत्या.
काँग्रेस हायकमांडने या दोन नेत्यांमधील वाद मिटवल्याचा दावा केला होता. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांमधील वाद मिटल्याचा दावा पक्षाने केला होता.