Rajasthan Election: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) राजस्थान दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जोधपूरमधील सभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी राज्यातील राजकारण तापवणाऱ्या लाल डायरीचाही उल्लेख केला. राजस्थानमध्ये 24 तास खुर्चीचा खेळ सुरू असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
जोधपूरच्या रावण चौकात एका विशाल जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची प्रत्येक कृती लाल डायरीत आहे. या लाल डायरीची रहस्ये उलगडली पाहिजेत. काँग्रेस सरकार लाल डायरीचे रहस्य उघड होऊ देणार का? सत्य जाणून घ्यायचे असेल तर भाजपचे सरकार स्थापन करणे आवश्यक आहे. राजस्थानमधील तरुण न्यायाची मागणी करत आहेत. आमचे सरकार आल्यावर आम्ही पेपर लीक माफियांवर कडक कारवाई करू.'
'आज भाजपला विरोध करताना काँग्रेसने भारताचा विरोध सुरू केला आहे. जोधपूर दंगलीच्या आगीत जळत असताना मुख्यमंत्री काय करत होते? असा एकही सण नाही ज्यात दगडफेकीच्या बातम्या येत नाहीत. राज्यात काँग्रेस आमदार स्वतः सुरक्षित नसल्याचे सांगतात. तुमच्या मताच्या बळावर राजस्थानमध्ये भाजपचे सरकार स्थापन होईल.'
'राजस्थानला पर्यटनात नंबर वन बनवायचे आहे. सरकारी कार्यक्रमातून मुख्यमंत्री गायब होते. का नव्हते? कारण मोदी आले तर सर्व काही ठीक होईल, असा त्यांना विश्वास आहे. आता त्यांनी विश्रांती घ्यावी, आम्ही सगळं ठीक करू,' असा टोलाही त्यांनी यावेळी गहलोत यांना लगावला.