राजस्थानमधीलकाँग्रेस आमदार दानिस अबरार यांच्या कारवर अज्ञातांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. राजस्थानमधील मालरणा चौड सवाई माधोपूर येथे हा हल्ला झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात अज्ञातांनी हल्ला केल्यानंतर दानिस अबरार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे माहिती दिली आहे. फेसबुकला लाईव्हमध्ये त्यांनी म्हटले की, "जेव्हा मी माझ्या कुटुंबासोबत कारने प्रवास करत होतो. त्याचवेळी अज्ञातांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. मला काँग्रेसकडून तिकीट मिळाले आहे. आम्ही निवडणूक लढवू आणि जिंकू," असेही ते म्हणाले.
याचबरोबर, आमदार दानिस अबरार यांनी म्हटले आहे की, "मी निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाला कारवाई करण्याची विनंती करत आहे की, या निवडणुकीत कोणत्याही उमेदवारांवर असे हल्ले व्हायला नकोत. माझी प्रशासनाला विनंती आहे की, त्यांनी गुंडावर कारवाई करावी. गेल्या दहा वर्षात झाले नाही, ते आज झाले आहे. माझी संपूर्ण कार फोडली आहे. माझ्या लोकांना मारहाण करण्यात आली आहे".
दरम्यान, राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या काँग्रेसच्या पहिल्या यादीत सवाई माधोपूरमधून दानिश अबरार यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आले आहे. दानिश अबरार यांची लढत भाजपचे राज्यसभा खासदार किरोडलाल मीणा यांच्याशी होणार आहे. गेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने किरोडीलाल यांना तिकीट दिले होते.