शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

Rajasthan Exit Poll: राजस्थानात काँग्रेस ट्रेंड बदलणार की भाजपा शतक ठोकणार? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 5:39 PM

विधानसभेच्या १९९ जागांसाठी १ हजार ८६३ उमेदवार रिंगणात आहेत. राजस्थानच्या दिग्गजांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे

जयपूर - राजस्थानात २५ नोव्हेंबरला १९९ जागांसाठी मतदान झाले. यावेळी मतदानाची टक्केवारी ७५.४५ टक्के होती. राजस्थानच्या सत्तेच्या चाव्या कुणाकडे जाणार याचा निर्णय ३ डिसेंबरला लागणार आहे. परंतु विधानसभा निवडणुकीचा एक्झिट पोल समोर आला आहे. २०१३ मध्ये भाजपाला १६३ जागा मिळाल्या होत्या तर २०१८ च्या निवडणुकीत भाजपाला ७३ जागांवर समाधान मानावे लागले होते. यंदाच्या निवडणुकीत इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार भाजपाला चांगली बढत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर सत्ताधारी काँग्रेसनंही कडवी झुंज दिल्याचं पाहायला मिळत आहे. 

या एक्झिट पोलमध्ये राजस्थानच्या एकूण १९९ मतदारसंघात ३८ हजार ६५६ लोकांचा सर्व्हे करण्यात आला होता.या सर्व्हेनुसार हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हडौती विभागात भाजपाला ११ तर काँग्रेसला ६ जागा मिळण्याची शक्यता आहे.अहिरवाल विभागात भाजपाला ९ जागा तर काँग्रेस १० जागांवर विजयी होण्याचा अंदाज आहे. शेखावटी भागात भाजपाला ७, काँग्रेसला १२ तर इतर २ जागांवर विजयी होण्याचा अंदाज आहे. मेवाड-गोडवाड भागात काँग्रेस-भाजपात अटीतटीची लढत आहे. एकूण मतदानानुसार, भाजपाला ४१ टक्के तर काँग्रेसला ४२ टक्के मते मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

इंडिया टुडे एक्झिट पोलनुसार राजस्थानचा अंदाज काय सांगतो?भाजपा - ८०-१०० काँग्रेस -८०-१०६इतर - ९-१८

जन की बात एक्झिट पोलमधील अंदाजभाजपा - १००-१२२काँग्रेस ६२-८५इतर - १४-१५

TV9 पोलस्ट्रेटचा अंदाजभाजपा - १००-११०काँग्रेस - ९०-१००इतर - ०-१५ 

निवडणुकीत 'हे' मुद्दे ठरले निर्णायकहिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून कन्हैया लालची हत्या, हिंदू सणांवरील रॅलीत दगडफेक, स्फोटातील आरोपी मुक्त होणे, पीएफआयची रॅली, भाजपानं पेपर लीक प्रकरण, गहलोत सरकारच्या काळात बेरोजगारी, महागाई यासारखे अनेक मुद्दे निवडणूक प्रचारात चर्चेत आले.

विधानसभेच्या १९९ जागांसाठी १ हजार ८६३ उमेदवार रिंगणात आहेत. राजस्थानच्या दिग्गजांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, सचिन पायलट, राज्यवर्धन सिंह राठोड आणि दिया कुमारी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतपेटीत (ईव्हीएम) बंद झालं असून या सर्वांचा फैसला ३ डिसेंबरला होणार आहे.राजस्थानच्या राजकीय इतिहासात गेल्या अनेक दशकांचा असा ट्रेंड आहे की, या राज्यात दर ५ वर्षांनी सत्ता परिवर्तन होते. परंतु यंदा जनतेचा कौल काय आहे हे पाहण्यासाठी ३ डिसेंबरची वाट पाहावी लागेल. 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस