राहुल गांधींनी तीच चूक केली, जी सोनियांनी गुजरातमध्ये केलेली; मोदींची ताकद ओळखताच आली नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 01:35 PM2023-12-03T13:35:46+5:302023-12-03T13:36:24+5:30

अशोक गहलोत यांनी कामाच्या जोरावर प्रचार केला होता. यातून धडा घेतला नाही तर २०२४ मध्ये इंडिया आघाडीला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

Rajasthan Election Result: Rahul Gandhi made the same mistake that Sonia did in Gujarat; Modi's strength could not be recognized... Panauti remark boomrang | राहुल गांधींनी तीच चूक केली, जी सोनियांनी गुजरातमध्ये केलेली; मोदींची ताकद ओळखताच आली नाही...

राहुल गांधींनी तीच चूक केली, जी सोनियांनी गुजरातमध्ये केलेली; मोदींची ताकद ओळखताच आली नाही...

काँग्रेसच्या हातून राजस्थान गेले आहे. याला राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेला पनौती हल्ला विविध कारणांपैकी एक असल्याचे तिन्ही राज्यांचे निकाल दर्शवत आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये राहुल गांधींनी केलेली वैयक्तीक टिपण्णी कारण ठरली आहे. राहुल यांनी तिच चूक केली जी सोनिया गांधी यांनी गुजरातमध्ये केली होती. पुन्हा एकदा राहुल गांधी मोदींची ताकद ओळखण्यात चुकल्याचे राजकीय धुरिणांमध्ये बोलले जात आहे. 

 सोनिया गांधी यांनी गुजरात निवडणुकीवेळी मोदी यांना मौत का सौदागर म्हटले होते. त्याचा परिणाम सर्वांना माहिती होता. तोच परिणाम उत्तरेकडील तिन्ही राज्यांच्या निकालांमध्ये दिसल्याचे बोलले जात आहे. अशोक गहलोत यांनी कामाच्या जोरावर प्रचार केला होता. परंतू, राहुल गांधी यांनी एका सभेत वर्ल्डकपमध्ये भारताची हार आणि मोदींची स्टेडिअममध्ये उपस्थितीवर मुद्दा छेडला. टीम इंडिया आरामात वर्ल्ड कप जिंकली होती. तिथे पनौतीने हरविले, टीव्हीवाले हे सांगणार नाहीत, परंतू जनतेला माहिती आहे, असे राहुल म्हणाले होते. या ३० सेकंदांचा व्हिडीओ देखील काँग्रेसने ट्विटरवर टाकला होता. 

सोनियांच्या यांच्या टीकेनंतर जशी काँग्रेस गुजरातमध्ये पिछाडीवर गेली तसाच परिणाम राहुल यांच्या वक्तव्याचा राजस्थानमध्ये दिसला. मोदींवर वैयक्तिक हल्ला हा विरोधकांवरच संकट आहे हे यातून समोर येत आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने मोदींवर हल्ला करणे टाळले होते, त्याचा फायदा तिकडे मिळाला होता. यावरून येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने यापासून धडा घ्यायला हवा, असेही राजकीय तज्ञ म्हणत आहेत. मोदींवर असेच वैयक्तिक हल्ले झाले तर २०२४ मध्ये इंडिया आघाडीला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 
 

Web Title: Rajasthan Election Result: Rahul Gandhi made the same mistake that Sonia did in Gujarat; Modi's strength could not be recognized... Panauti remark boomrang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.