Rajasthan Election:राजस्थानमध्ये पुन्हा गेहलोत यांची जादू चालणार की, 5 वर्षात सरकार बदलण्याचा ट्रेंड कायम राहणार, हे येत्या 3 डिसेंबरच्या निकालातून स्पष्ट होईल. निकालापूर्वी आलेल्या एक्झिट पोलने भाजप आणि काँग्रेसची धाकधूक वाढली आहे. विविध एक्झिट पोलनुसार, काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत दिसून येत आहे. यादरम्यान, भाजच्या गोटातून मुख्यमंत्रीपदासाठी एक नावही समोर आलं आहे, ज्याने सर्वांनाच चकीत केलंय.
आज तक अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, मुख्यमंत्रीपदासाठी लोकांची पहिली पसंती अशोक गेहलोत यांना होती. सर्वेक्षणात ज्या लोकांशी चर्चा करण्यात आली, त्यापैकी 35 टक्के लोकांना गेहलोत यांनाच मुख्यमंत्री पाहायचे आहे. मात्र, या यादीत ना वसुंधरा राजे यांचे नाव आहे ना सचिन पायलट यांचे नाव आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर महंत बालकनाथ योगी यांचे नाव आहे. सर्वेक्षणात 10 टक्के लोकांनी बालकनाथ योगी यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. अशावेळी प्रश्न पडतो की, कोण आहेत बालकनाथ योगी?
कोण आहेत बालकनाथ योगी?महंत बालकनाथ योगी यांचा जन्म 16 एप्रिल 1984 रोजी राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील कोहराना गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. बालकनाथ योगी हे अलवरचे खासदार आहेत. भाजपने त्यांना तिजारा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. भाजपच्या फायरब्रँड नेत्यांपैकी एक असलेले बाबा बालकनाथ योगी आदित्यनाथ यांच्यासारखे कपडे घालतात. त्यामुळे लोक त्यांना राजस्थानचे योगी म्हणतात. बाबा बालकनाथ यांची अलवर आणि आसपासच्या परिसरात मजबूत पकड असल्याचे मानले जाते. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीतही भाजपने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. ते भाजपच्या हिंदुत्वाच्या अजेंड्याला फिट बसतात. निवडणुकीपूर्वी भाजपने राजस्थानमध्ये आपल्या युनिटची घोषणा केली, तेव्हा त्यांना उपाध्यक्ष करण्यात आले.
वयाच्या 6 व्या वर्षी घर सोडलेत्यांच्या कुटुंबाने त्यांना वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी महंत खेतनाथ यांच्याकडे अध्यात्माचा अभ्यास करण्यासाठी पाठवले. महंत खेतनाथ यांनी लहानपणीच त्यांना गुरुमुख नाव दिले होते. महंत खेतनाथ यांच्याकडून शिक्षण घेतल्यानंतर ते महंत चंदनाथ यांच्याकडे आले. त्यांची बालसुलभ प्रवृत्ती पाहून महंत चंद नाथ त्यांना बालकनाथ म्हणू लागले. महंत चंद नाथ यांनी 29 जुलै 2016 रोजी त्यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली. महंत बालकनाथ योगी हे हिंदू धर्मातील नाथ संप्रदायाचे आठवे संत आहेत. बालकनाथ योगी हे बाबा मस्तनाथ विद्यापीठाचे कुलपतीही आहेत.
योगी आदित्यनाथ यांच्या जवळचेयोगीसारखे भगव्या कपड्यात दिसणारे बाबा बालकनाथ आपल्या आक्रमक वृत्तीमुळे अनेकदा चर्चेत राहतात. बाबा बालकनाथ यांनी 2019 मध्ये पहिली लोकसभा निवडणूक जिंकली. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री भंवर जितेंद्र सिंह यांचा 3 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. बाबा बालकनाथ हे त्याच नाथ संप्रदायाचे महंत आहेत, ज्यांच्याशी योगी आदित्यनाथ संबंधित आहेत. बालकनाथ हे रोहतक येथील बाबा मस्तनाथ मठाचे महंत आहेत. नाथ संप्रदायाच्या परंपरेनुसार योगी आदित्यनाथ हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तर रोहतक गद्दी यांच्याकडे उपाध्यक्षपद आहे. त्यामुळे ते सीएम योगींच्या जवळचे मानले जातात.