सोनिया गांधींना 2 बहिणी, मग भाऊ बणून कोण आलं? राजेंद्र गुढा यांचा लाल डायरीसंदर्भात मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 02:51 PM2023-11-23T14:51:33+5:302023-11-23T14:52:29+5:30
Laal Diary Politics: या लाल डायरीत सोनिया गांधींच्या भावाचा उल्लेख होता, असे त्यांनी म्हटले आहे. हॉटेल शिव विलासच्या मालकाच्या मुलाच्या एका समारंभातात सोनिया गांधी यांचा भाऊही आला होता, असा खुलासा त्यांनी केला आहे.
संपूर्ण राजस्थान विधानसभा निवडणूक प्रचाराने ढवळून निघाला आहे. यातच आता लाल डायरी प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गुढा यांनी या डायरीसंदर्भात आता आणखी एक मोठा खुलासा केला आहे. गुढा यांनी आपल्या खुलाशाने काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अस्वस्थता निर्माण केली आहे. या लाल डायरीत सोनिया गांधींच्या भावाचा उल्लेख होता, असे त्यांनी म्हटले आहे. हॉटेल शिव विलासच्या मालकाच्या मुलाच्या एका समारंभातात सोनिया गांधी यांचा भाऊही आला होता, असा खुलासा त्यांनी केला आहे.
"सोनिया गांधींना दोन बहिणी, तर मग भाऊ बणून जयपूरला कोन आलं?" -
या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना गुढा म्हणाले, मख्यमंत्र्यांच्या ओएसडींसोबत त्यांच्या (सोनिया गांधींचा कथित भाऊ) भेटीची वेळ निश्चित करण्यासही सांगण्यात आले होते. गुढा यांच्या या दाव्यानंतर, जयपूर येथील विवाह समारंभात सोनिया गांधींचा भाऊ बणून कोण आले होते? मुख्यमंत्र्यांचे ओएसडी शशिकांत शर्मा यांच्यासोबत कुणाची वेळ निश्चित करण्यास सांगण्यात आले होते? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. महत्वाचे म्हणजे, या आरोपांबरोबरच, सोनिया गांधींना दोन बहिणी आहेत, मग हा भाऊ बणून कोण आले होते? असा सवाल गुढा यांनीही केला आहे.
"यांच्याकडे ED-CBI मग लाल डायरीवर कारवाई का नाही?" -
राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत लाल डायरी प्रकरण चर्चेत आहे. आता राज्यात मतदानाला केवळ दोन दिवस शिल्लक असतानाच पुन्हा एकदा लाल डायरीचा मुद्दा चर्चेत आला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी सकाळी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत, लाल डायरीच्या मुद्द्यावरून भाजप आणि केंद्र सरकारला लक्ष्य केले. 'लाल डायरी? कोणती लाल डायरी...? जर त्यांच्याकडे लाल डायरी असेल तर काय कारवाई केली? ईडी आणि सीबीआय देखील त्यांच्याकडे आहे,' असे गेहलोत यांनी म्हटले आहे.
महत्वाचे म्हणजे, राजस्थानात 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यामुळे 23 नोव्हेंबरच्या सायंकाळपासून येथे प्रचार थांबेल. तसेच, 3 डिसेंबरला निवडणूक निकाल जाहीर होणार आहेत.