जयपूर - राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये भूकंपाचे मोठे हादरे बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टक स्केल एवढी सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे भूकंपाचे हादरे बसल्यानंतर शहरातील लोक घराबाहेर धावत आले होते, मोकळ्या रस्त्यावर येऊन स्वत:चा जीव वाचविण्यासाठी धडपड केल्याचंही पाहायला मिळालं. पहाटे ४.०९ वाजता भूकंपाच पहिला धक्का बसला. एका पाठोपाठ एक तीन धक्के बसल्याची माहिती आहे.
दरम्यान, भूकंपाच्या घटनेनंतर स्थानिकांनी घरातून बाहेर पडल्यानंतर हनुमान चालिसा पठण करत देवाकडे प्रार्थना केली. तर, अनेक ठिकाणी घरं, इमारती हलतानाचे व्हिडिओही आता समोर आले आहेत. पहाटे, ४.२३ आणि ४.२५ वाजताच्या सुमारास अनुक्रमे दुसरा आणि तिसरा भूकंपाचा धक्का बसला आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनीही ट्विट करुन जयपूर शहरात भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती दिली.
दरम्यान, येथील भूकंपाच्या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मी़डियातून समोर आले असून नागरिकांनी मोठी धावपळ केल्याचंही त्यात दिसत आहे. तसेच, घराच्या भींती हलतानाही दिसून येत आहे.
दरम्यान, पुन्हा एक भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे.