मकर राशीच्या जातकांना २०२१ चे वर्ष एकदम चांगलेच जाणार आहे. वर्षाच्या सुरवातीपासूनच आपली प्रगती साधण्याची इच्छा प्रबळ होईल. आपल्या वैवाहिक जीवनातसुद्धा हे वर्ष माधुर्य पसरवणारे असून वैवाहिक जीवनात एकोपा निर्माण करणारे आहे. व्यापारी दृष्टिकोनातून हे वर्ष आपली आर्थिक उन्नती करणारे आहे. आपल्या व्यापारात सतत वृद्धी होत राहील. काही लोकांना परदेशी जाऊन आपले घर घेण्याची संधी मिळेल, तर काहीजणांना व्यापाराच्या निमित्ताने दूरवरचे प्रवास करून चांगला लाभ होईल. मकर राशीच्या जातकांना कौटुंबिक वातावरणात सलोखा असल्याची जाणीव होईल. कौटुंबिक वातावरण आपल्या जीवनात प्रेम व स्नेह ह्यांची अभिवृद्धी करेल. आपल्या कुटुंबातील छोटी भावंडे, आपले नातेवाईक व आपले मित्र आपल्या पाठीशी उभे राहून कोणत्याही परिस्थितीत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतील. आपला स्वविवेक व आपल्या कष्टांवर विश्वास ठेवल्याने प्रत्येक बाबतीत आपण यश प्राप्त करू शकाल. २०२१ दरम्यान मकर राशीच्या जातकांना एखादी चांगली संपत्ती विशेष प्रयत्न न करता सहजपणे मिळण्याची शक्यता आहे. आपणास जर नवीन घर खरेदी करावयाचे असेल तर ह्या वर्षी आपली इच्छा नक्कीच पूर्णत्वास जाईल. ह्या वर्षी आपल्या संततीची सुद्धा चांगली प्रगती होईल. आपण जर विद्यार्थी असाल तर थोडे अडथळे येऊ शकतात, मात्र आपण जर व्यापार किंवा नोकरी करत असाल तर हे वर्ष आपणास प्रगतीच्या उच्च शिखरावर घेऊन जाईल. आपल्या महत्वाकांक्षांची पूर्तता होईल. आपण एक चांगली व्यक्ती म्हणून नावारूपास याल. आपण आजवर पैशांच्यामागे जी धावपळ करत होता ती मंदावून आपण नातेसंबंध व कुटुंबास प्राधान्य द्याल. आपल्या मनात परोपकाराची भावना बळावल्याने वेळोवेळी समाजाच्या हितासाठी व गरजवंतांच्या मदतीसाठी पुढाकार घ्याल. त्यामुळे त्यांच्या मनात आपल्याप्रति श्रद्धा निर्माण होईल. ते आपणास शुभेच्छा देतील व समाजात सुद्धा आपणास प्रसिद्धी मिळेल. आपली लोकप्रियता वाढेल, मात्र डोक्यात त्याची हवा गेल्यास आपणास त्याचा त्रास होण्याच्या शक्यतेमुळे आपण काळजी घ्यावी.
वैवाहिक जीवन (Capricorn, Love and relationship Horoscope 2021)
मकर राशीच्या जातकांच्या वैवाहिक जीवनासाठी २०२१ चे वर्ष उत्तम आहे. आपण आपल्या वाक्चातुर्याने आपल्या प्रियव्यक्तीचे हृदय जिंकण्यात यशस्वी व्हाल व परिणामतः आपले वैवाहिक जीवन खुलून उठेल. आपल्या प्रियव्यक्तीची नाराजी दूर करण्याची कला आपणास अवगत आहेच. आपली हीच कला त्यांचे हृदय जिंकू शकेल. वेळोवेळी आपल्या प्रियव्यक्तीसाठी आपण भेटवस्तू घेऊन गेल्यास त्यांना ते अधिक आवडेल. २०२१ च्या सुरवातीचे महिने मकर राशीच्या जातकांसाठी अधिक अनुकूल असून त्या दरम्यान त्यांना प्रेमालापाच्या अनेक संधी मिळतील. त्या नंतर जुलै - ऑगस्ट व ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यानच्या महिन्यात वैवाहिक जीवन अधिक प्रबळ होईल. मकर राशीच्या विवाहितांचे वैवाहिक जीवन ह्या वर्षात उत्तम राहील. आपल्या संबंधात जी काही कटुता निर्माण झाली होती ती आता संपुष्टात येऊन संबंधातील जवळीक वाढेल. मे ते ऑगस्ट महिन्या दरम्यान आपल्या दोघातील वैचारिक भिन्नतेमुळे काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी. त्या नंतर परिस्थिती पुन्हा चांगली होईल.
१२ राशींचे २०२१ चे भविष्य वाचण्यासाठी क्लिक करा!
आर्थिक (Capricorn, Finance Horoscope 2021)
आर्थिक दृष्ट्या २०२१ ची सुरवात मकर राशीच्या जातकांसाठी काहीशी नाजूकतेने होईल. ह्या दरम्यान आपल्या खर्चात अचानकपणे वाढ होईल व विनाकारण प्रवास करावा लागल्याने पैसा खर्च होईल. असे असले तरी जसा दुसरा महिना सुरु होईल तशी आपली आर्थिक स्थिती सुधारू लागेल. आपल्या प्राप्तीत सुद्धा मोठी वाढ होईल. ह्या संपूर्ण वर्षात सतत आपल्या प्राप्तीत वाढ होत असल्याचे दिसून येईल, व त्यामुळे आपले आर्थिक स्तर सुद्धा उंचावेल. मकर राशीच्या व्यापाऱ्यांना २०२१ च्या सुरवातीचे महिने तसेच मे ते जुलै पर्यंतचे दिवस व नोव्हेंबर - डिसेंबर हे महिने व्यापारात उत्तम आर्थिक लाभ मिळवून देणारे आहेत. ह्या दरम्यान आपणास उत्तम धनप्राप्ती होऊन विविध प्रकारे फायदा होईल. आपणास काही अवांछित मार्गाने, जसे कि लॉटरी, शेअर्स बाजार इत्यादीतून सुद्धा आर्थिक प्राप्ती होण्याची शक्यता आहे.
नोकरी, व्यवसाय, करिअर (Capricorn, Job-Career-Business Horoscope 2021)
आपण जर नोकरी करत असाल तर २०२१ च्या सुरवातीस अनेक प्रकारचे फायदे होतील. वरिष्ठांशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांमुळे वेळो वेळी आपणास लाभ होत राहील. कामाप्रती आपल्या मनात व्यासंग असेल. आपण प्रत्येक काम पूर्ण निष्ठेने कराल. संपूर्ण वर्षभर आपल्या कामावर आपण लक्ष केंद्रित केल्याने एक कर्मठ कर्मचारी किंवा अधिकारी ह्या स्वरूपात आपली प्रतिमा निर्माण होईल. अशा स्थितीचा आपणास पूर्ण लाभ मिळेल. आपण जर व्यापार करत असाल तर आपल्या व्यापारास विचार पूर्वक प्रगती पथावर ठेवावे लागेल. मकर राशीच्या जातकांनी आपल्या व्यापारात विनाकारण कोणाशी भागीदारी करू नये. आपण जर एकट्यानेच व्यापार करत असाल तर २०२१ दरम्यान तो एकट्यानेच करावा. आपण जर भागीदारीत व्यापार करत असाल तर त्यात आणखी भर घालू नये. अन्यथा आपणास नुकसान सोसावे लागेल. तसे पाहू गेल्यास आपला व्यवहार व्यापार वृद्धीस मदतरूप ठरेल.
शिक्षण (Capricorn, Education Horoscope 2021)
मकर राशीच्या जातकांना २०२१ चे वर्ष अत्यंत अनुकूल आहे. वर्षाच्या सुरवातीपासून ते अखेरपर्यंत आपल्यात उत्तम आत्मविश्वास असेल. २०२१ दरम्यान आपल्या बुद्धीची तीव्रता वाढेल. आपली स्मरणशक्ती विकसित होईल व आपणास सर्व विषयांचे सुलभतेने आकलन होईल. त्यामुळे परीक्षेत उत्तम कामगिरी करून दाखविण्यात आपण यशस्वी होऊ शकाल. असे असले तरी अध्ययन करताना अडथळे येण्याची शक्यता असून आपण जर परिश्रम वाढवलेत तर अनुकूल परिणाम मिळण्यात काही अडचण येणार नाही. शैक्षणिक क्षेत्रात व्यसनांपासून आपणास दूर राहावे लागेल हे मात्र ध्यानात ठेवावे. आपणास जर एखादे व्यसन जडले तर २०२१ दरम्यान आपणास त्याचा त्रास होईल व त्यातून बाहेर पडणे आपणास जड जाईल, तेव्हा कोणत्याही प्रकारच्या व्यसनाच्या विळख्यात आपण अडकू नये हे उत्तम.
आरोग्य (Capricorn, Health Horoscope 2021)
आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहता मकर राशीच्या जातकांसाठी २०२१ ची सुरवात काहीशी नाजूकतेने झाली तरी आपले मनोबल ह्या वर्षात उंचावलेले असेल. आपल्या आरोग्याची आपण यथायोग्य काळजी घेऊन वेळो वेळी स्वतःची वैद्यकीय तपासणी सुद्धा करून घ्याल. व्यायाम किंवा योगासने करून स्वतःला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न आपण कराल. २०२१ च्या मध्यास पोटाचे विकार, पाय दुखणे किंवा वात विकार होण्याची शक्यता असल्याने त्या दरम्यान आपणास थोडी काळजी घ्यावी लागेल. योग्य काळजी न घेतल्यास हे विकार मोठ्या दुखण्यात परिवर्तित होण्याच्या शक्यतेमुळे त्यांच्याकडे गंभीरतेने बघावे. अशा स्थितीकडे दुर्लक्ष न करता आरोग्य निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करावा. ह्या वर्षाचे अखेरचे महिने आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले राहणारे असून आपल्या जुन्या विकारातून सुद्धा ह्या दरम्यान आपली सुटका होऊ शकेल.