मेष - आरोग्याची काळजी घ्या. बाहेर खाणेपिणे टाळलेले बरे. गुप्तशस्त्रू कारवाया करतील. नोकरीत दबदबा राहील. त्याचा काही लोकांना त्रास होईल. मुलांना यश मिळेल.
वृषभ- घरात आनंदी वातावरण राहील. मुलांना चांगल्या संधी चालून येतील. प्रवास कार्य साधक ठरतील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
मिथुन - नवीन जबाबदारी पार पाडावी लागेल. घरी पाहुणे येतील. नोकरी आणि घर या दोन्ही आघाड्यांवर महिलांना कसरत करावी लागेल. जीवनसाथाचे चांगले सहकार्य मिळेल.
कर्क - काहींना कामानिमित्त बाहेर जावे लागेल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. गप्पागोष्टी रंगतील. मनावरचा ताण कमी होईल. व्यवसायात विक्री चांगली राहील.
सिंह - परिस्थीतीचा फायदा घ्या. सर्वांचे सहकार्य मिळेल. जीवनसाछी आपल्याला सांभााळून घेईल. धनलाभच्या दृष्टीने अतिशय चांगला काळ आहे. मुलांचे हट्ट पुरविले जातील.
कन्या - दिवसा कामाची पुर्वतयारी करा. मनात सकारात्मक विचार राहतील. कामात उत्साह राहील. खाण्यापिण्याची बंधने पाळा. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत प्रगती होईल.
तूळ- काहींना कामानिमित्त प्रवास घडून येईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. व्यवसायात व्यस्त राहाल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील.
वृश्चिक - विविध प्रकाराचे फायदे होतील. योग्य मार्गदर्शन मिळेल. मालमत्तांच्या व्यवहारांना गती मिळेल. घरात किरोकोळ कारणावरुन मतभेद होऊ शकतात.
धनु - प्रवासाचे योग येतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. काहींना नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. काहींची बदली होऊ शकते. मनासारखे पदार्थ ताटात दिसतील. जीवनसाथी तुमच्या मर्जीनूसार वागेल.
मकर - महत्वाची कामे सायंकाळच्यानंतर करा, अन्यथा वेळ, पैसा आणि मनस्थाप सहन करावा लागेल. त्यामुळे थोडा संयम ठेवला तर कामे विनासयास पार पडतील. काहींना प्रवास करावा लागेल. चांगल्या मित्रांच्या संगतीत राहा.
कुंभ- धनलाभच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. एखाद्या सौद्यात मनासारखा फायदा होईल. महत्वाची कामे दूपरच्या आत उरकून टाका. त्यानंतर दगदग होईल. तब्यतेची काळजी घ्या.
मीन- समिश्र ग्रहमान आहे. काही कामे मार्गी लागतील. काहींना अडचणी येतील. थोडा संयम ठेवलेला बरा. जीवनसाथी तुमच्या मर्जीनूसार चालेल. नोकरीत प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु राहील. -विजय देशपांडे(ज्योतिष विशारद)