शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Rashi Bhavishya: आजचं राशीभविष्य, २६ एप्रिल २०२२; ग्रहमानाची साथ अन् नोकरीत प्रगतीला वाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 7:25 AM

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ६, १९४४. तिथी- चैत्र कृष्ण एकादशी (दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री ००.४९ पर्यंत), श्री शालिवाहन ...

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ६, १९४४. तिथी- चैत्र कृष्ण एकादशी (दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री ००.४९ पर्यंत), श्री शालिवाहन शके १९४४. शुभकृत् नाम संवस्तर, नक्षत्र- संध्याकाळी ४.५६ पर्यंत शततारका. त्यानंतर पूर्वा भाद्रपदा. रास- कुंभ, आज- चांगला दिवस. वरुथिनी एकादशी. राहू काळ- दुपारी ३ ते ४.३० (राहू काळात महत्वाची कामे टाळा)

मेष- ग्रहमानाची साथ तुम्हाला मिळेल. मनात उत्साहवर्धक विचार राहतील. एखाद्या मोठ्या व्यवहारात लाभ होईल. जुनी येणी वसूल होतील. शुभवर्तमान कळेल. तुमचे पारडे जड राहील. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल. अनुकूल घटना घडतील. 

वृषभ-नोकरीत प्रगतीला वाव राहील. एखाद्या मोठ्या प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. पद-प्रतिष्ठा प्राप्त होईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जीवनाचा दर्जा उंचावण्याचा दृष्टीने चांगला काळ आहे. 

मिथुन- यशदायक काळ आहे. तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात लाभ होईल. प्रवास घडून येईल. नवीन ओळखी होतील. त्यातून फायदा होईल. अडचणी दूर होतील. नोकरीत प्रगती होईल. एखादी इच्छा पूर्ण होईल. नावलौकिक वाढविणाऱ्या घटना घडतील. 

कर्क- नोकरीत मनासारखे निर्णय होतील. काहींना मोठे पद मिळू शकते. तुमच्या शब्दाचा मान राखला जाईळ. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. अकल्पितपणे आर्थिक लाभ होईल. कायद्याची बंधने पाळा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. 

सिंह- विवाहेच्छूंचे विवाह ठरण्याच्या दृष्टीने हालचाली होतील. प्रेमात असाल तर घरातील वडीलधाऱ्या मंडळींना सांगण्यास हरकत नाही. हाती घेतलेले कार्य सिद्धीस जाईळ. व्यवसायात बरकत राहील. नोकरीत अनुकूल स्थिती राहील. 

कन्या- महत्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. त्या दृष्टीने सावधपणे पावले उचण्याची गरज आहे. काम झालेच पाहिज असा अट्टाहास असता कामा नये. थोडे संयमाने वागणे आवश्यक आहे. आरोग्याची काळजी घ्या. एखादी व्यक्ती तुम्हाला फसवू शकते. 

तूळ- समाजसेवा करण्यात आघाडीवर राहाल. लोक तुमची प्रशंसा करतील. जोडीदार आपल्याला सांभाळून घेईल. नोकरीत कामाचा ताण कमी होईल. सहकारी मदत करतील. शुभ समाचार कानावर पडतील. हाती घ्याल ते तडीस न्याल अशी परिस्थिती राहील. 

वृश्चिक-नोकरीत बढतीसाठी प्रयत्न करण्यास हरकत नाही. थोड्या फार प्रयत्नाने काम होईल. लोकांची साथ राहील. त्यामुळे काम करण्यास हुरूप राहील. घरी पाहुणे येतील. इष्ट मित्र भेटतील. काहींना भेटवस्तू मिळतील. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. 

धनू- धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. व्यवसायात विक्री चांगली होईल. बरेच दिवस पडून राहिलेला माल विकला जाऊ शकतो. नोकरीत प्रगतीला पोषक वातावरण राहील. जवळचे नातेवाईक भेटतील. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवास फायदेशीर ठरतील. 

मकर- होती घेतलेले काम पूर्ण कराल. अनेकांचे सहकार्य़ मिळेल. कामाचा ताण जाणवणार नाही. सोप्या रीतीने कामे पार पडतील. आर्थिक आवक मनासारखी राहील. जमीनजुमल्याची कामे मार्गी लागतील. आवडते पदार्थ खाण्यास मिळतील. नोकरीत प्रगती होईल. 

कुंभ- नोकरीत उच्च पद, अधिकार मिळतील. तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. जोडीदार छान साथ देईल. धनलक्ष्मीची कृपा राहील. लोकांचे सहकार्य मिळेल. मनात आनंदी विचार राहतील. महत्वाचे काम पूर्ण होईल. 

मीन- वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. घरात बसणे होणार नाही. सतत काही ना काही कामे मागे लागलेली राहतील. व्यवहार सावधपणे करा. कामाचे नियोजन नीट करा. एखाद्या योजनेत फसवणूक होण्याची शक्यता आहे. 

- विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्य