शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, गुरुवार २१ एप्रिल २०२२; महत्त्वाचे निरोप येतील, भाग्याचे पाळबळ मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 7:18 AM

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १, १९४४. तिथी- चैत्र कृष्ण पंचमी (दुपारी ११.१३ पर्यंत), श्री. शालिवाहन शके १९४४. शुभकृत ...

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १, १९४४. तिथी- चैत्र कृष्ण पंचमी (दुपारी ११.१३ पर्यंत), श्री. शालिवाहन शके १९४४. शुभकृत नाम सवत्सर, नक्षत्र- रात्री ९.५१ पर्यंत मूळ. त्यानंतर पूर्वाषाढा. रास- धनू, आज- चांगला दिवस. राहू काळ- दुपारी १.३० ते ३ (राहू काळात महत्वाची कामे टाळा)

मेष- भाग्याचे पाठबळ मिळेल. मनात आनंदी विचार राहतील. सकारात्मक विचार कराल. विविध क्षेत्रांत यश मिळेल. अडचणी दूर होतील. प्रवास कार्य साधक ठरतील. नावलौकिक वाढविणाऱ्या घटना घडतील. आर्थिक आवक चांगली राहील. जीवनसाथी साथ देईल.

वृषभ-आर्थिक आवक चांगली राहील. महत्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. कामाचा ताण राहील. वाहन जपून चालवा. दगदग होईल अशी कामे करू नका. संय सोडू नका. सकारात्मक विचार करा. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. अनेकांचे सहकार्य मिळेल. 

मिथुन- मुलांना चांगल्या संधी मिळतील. त्यांचे कौतुक होईल. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. नोकरीत सहकारी वर्गाशी जपून व्यवहार करा. इतरांच्या भानगडीत पडू नका. नसता मनस्ताप सहन करावा लागेल. विविध प्रकारचे लाभ होतील. 

कर्क-नोकरीत चांगली परिस्थिती राहील. तुमचे महत्व सर्वांच्या लक्षात येईल. मात्र तब्येतीकडे दुर्लक्ष करुन कामाचा ताण वाढवून घेऊ नका. लोक कौतुक करतात म्हणून हुरळून जाऊ नका. मुत्सद्दीपणाने वागून कामे करा. मोठ्या प्रकल्पात अडचणी येतील. 

सिंह-मुलांना यश मिळेल. त्याची काळजी घ्या. त्यांच्याशी संवाद साधा. काहींना प्रवास करावा लागेल. महत्वाच्या कामात यश मिळेल. महत्वाचे निरोप येतील. प्रसिद्धी, मान-सन्मान मिळेल. आपले बोलणे लोकांना आवडेल. प्रशंसा होईल. 

कन्या-संमिश्र ग्रहमान राहील. घरी पाव्हण्या रावळ्यांचा राबता राहील. विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खाण्यास मिळतील. नोकरीत नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. कामाचा व्याप सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल. शांत चित्ताने कामे करण्याची गरज आहे. 

तूळ- व्यवसायात विक्री चांगली होईल. कामानिमित्त बाहेरगावी जावे लागू शकते. मोठी गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्या. बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. उसने पैसे देताना विचार करुन द्या. भावंडांच्या भेटी होतील. जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल. 

वृश्चिक-जनसंपर्क वाढेल. विविध क्षेत्रांतील लोकांची भेट होईल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत अनेकांचे सहकार्य मिळेल. मात्र कुणाला दुखवू नका. मुलांना यश मिळेल. मनोबल चांगले राहील. आत्मविश्वासाने कामे कराल. 

धनू- महत्त्वाच्या कामात यश मिळेल. अडून राहिलेली कामे मार्गी लागतील. सर्वांचे सहकार्य मिळेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. व्यवसायात बरकत राहील. 

मकर-आर्थिक आवक चांगली राहील. मनासारखी धनप्राप्ती होईल. मात्र खर्च करण्याकडे कल राहील. उधळपट्टीला आवर घातला पाहिजे. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. काही कारणाने प्रवास करावा लागेल. आवडते पदार्थ भोजनाच्या थाळीत दिसतील. 

कुंभ- विविध प्रकारचे लाभ होतील. हाती पैसा येईल. जीवनसाथीशी सूर जुळतील. भेटवस्तू मिळतील. काहींना पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास घडतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यवसायात बरकत राहील. नोकरीत सर्वांचे सहकार्य मिळेल. 

मीन-घरी पाहुणे येतील. मालमत्तेची कामे मार्गी लागतील. नोकरीत अनुकूल बदल होतील. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर संधी मिळेल. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. खाण्या-पिण्याची विपुलता राहील. 

- विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्य