राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख २, १९४४. तिथी- चैत्र, कृष्ण षष्ठी (सकाळी ८.४३ पर्यंत), श्री शालिवाहन शके १९४४. शुभकृत नाम संवत्सर, नक्षत्र- रात्री ८.१४ पर्यंत पूर्वाषाढा. त्यानंतर उत्तराषाढा. रास- दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री १.५२ पर्यंत धनू. त्यानंतर मकर. आज- चांगला दिवस. राहू काळ- सकाळी १०.३० ते १२ वातेपर्यंत (राहू काळात महत्वाची कामे टाळा)
मेष-ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. अनेक प्रकारचे फायदे होतील. सहकारी मदत करतील. योग्य मार्गदर्शन मिळेल. मनात उत्साह राहील. कामात हुरूप राहील. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जोडीदार तुमच्या मर्जीनुसार वागेल.
वृषभ-कामाचा व्याप सांभाळताना थोडी दगदग होईल. मात्र नियोजन नीट केले तर फारसा त्रास होणार नाही. महत्वाचे काम शक्यतो पुढे ढकला. विविध मार्गांनी धनप्राप्ती होील. कायद्याची बंधने पाळा. लोक तुमच्या मदतीसाठी पुढे येतील.
मिथुन-नोकरी सामान्य परिस्थिती राहील. तुमच्या अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळेल असे नाही. कुणाला स्वत:हून सल्ला देऊ नका. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. व्यवसायात बरकत राहील. अनपेक्षितपणे भेटवस्तू मिळू शकतात.
कर्क-महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. शक्यतो काम पुढे ढकलणे योग्य ठरेल. अन्यथा मनस्ताप सहन करावा लागेल. थोडे संयमाने वागणे चांगले. नोकरीत कामाचा उरक दांडगा राहील. कौतुकाची थाप पाठीवर पडेल. आरोग्याची काळजी घ्या.
सिंह-अनुकूल वातावरण राहील. मुले प्रगती करतील. त्यांना योग्यतेनुसार संधी मिळेल. एखाद्या व्यवहारात चांगला फायदा होईल. जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल. नावलौकिकात भर पडणाऱ्या घटना घडतील. ओळखी होतील.
कन्या- नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. कामाचे स्वरुप बदलेल. नवीन संधी चालून येतील. एखाद्या प्रकल्पात लक्ष घालावे लागेल. विषय नीट समजून घ्या. घाई गडबड करू नका. कामांची आखणी नीट करा. नातेवाईक, स्नेहीजन भेटतील. मनासारखे भोजन मिळेल.
तूळ-आर्थिक व्यवहार जपून करा. लगेच हुरळून जाऊ नका. व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत चांगली परिस्थिती राहील. प्रवास होऊ शकतो. जोडीदार चांगली साथ देईल. चुकीचे सल्ले देणाऱ्या लोकांना ओळखा आणि त्यांना बाजूला ठेवा.
वृश्चिक-जुने मित्र भेटतील. त्यांच्याशी गप्पाटप्पा होतील. मन मोकळे झाल्यासारखे होईल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. नवीन ओळखी होतील. मनासारखे पदार्थ खाण्यास मिळतील. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. मुले प्रगती करतील.
धनू-नोकरीत कामाचा ताण कमी होईल. व्यवसायात विक्री चांगली होईल. हाती पैसा येईल. लोकांच्या भेटीगाठी होतील. महत्त्वाचे काम मार्गी लागेल. एखाद्या व्यवहारात पुढाकार घ्याल. नातेवाइकांच्या संपर्कात राहाल. जोडीदाराचा सल्ला महत्त्वाचा ठरेल.
मकर-धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. जुनी येणी वसुल होतील. चैनीच्या वस्तूंची खरेदी कराल. मनासारखे भोजन मिळेल. एखाद्या व्यवहारात अडथळा येऊ शकतो. प्रवास होतील. करमणुकीच्या कार्यक्रमाचा आनंद लुटाल.
कुंभ-जोडीदाराच्या मर्जीनुसार वागणे इष्ट ठरेल. विविध प्रकारचे लाभ होतील. आर्थिक आवक राहील. मालमत्तेची कामे मार्गी लागतील. नोकरीत अनुकूल स्थिती राहील. व्यवसायात विक्री होईल. जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न कराल.
मीन-नोकरीत कामाचे स्वरुप बदलेल. नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. आर्थिक आवक राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल. मनासारखे भोजन मिळेल. जवळचे लोक भेटतील. मनात आनंदी विचार राहतील.
- विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)