शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ९ एप्रिल २०२२; आर्थिक उलाढाली जपून करा, महत्त्वाचे निरोप येतील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2022 7:26 AM

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र १९, १९४४. तिथी चैत्र शुक्ल अष्टमी. ( उत्तर रात्री १.४६ पर्यंत), श्री शालिवाहन शके १९४४. शुभकृत नाम संवत्सर, नक्षत्र : दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री ०४.३२ पर्यंत पुनर्वसू. त्यानंतर पुष्य : रास - रात्री ९.५१ पर्यंत मिथून, त्यानंतर कर्क. आज : चांगला दिवस : राहू काळ: सकाळी ९ ते १०.३०. (राहू काळात महत्त्वाची कामे टाळा.)

मेष- आर्थिक उलाढाली जपून करा. व्यवसायात विक्री चांगली होईल. मात्र, एखादा अंदाज चुकू शकतो. विविध प्रकारचे फायदे होतील. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होतील. लोकांच्या भेटीगाठी होतील, आवडते पदार्थ ताटात दिसतील. महत्त्वाचे निरोप येतील. 

वृषभ - जीवनसाथीशी वाद टाळणे योग्य ठरेल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका, वाहन जपून चालवा. कुणाचा अपमान होईल, असे बोलू नका. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. एखाद्या निरोपाची वाट पाहण्यात वेळ जाईल. आवडत्या छंदासाठी वेळ काढा. 

मिथून - नोकरीत अनुकूल परिस्थिती राहिल. अडचणी दूर होतील, महत्त्वाचे निरोप येतील. कामे वाढतील. लोकांना मदत करण्यासाठी वेळ द्याल, त्यामुळे घराकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घ्या. घरात नाराजी राहिल विरोधकांच्या कारवाया चालूच राहतील.

कर्क - नोकरीत प्रगतीच्यादृष्टीने हालचाली सुरू राहतील. काही लोकांना तुमची प्रगती बघवणार नाही. मात्र, या गोष्टीचा त्रास करुन घेऊ नका. जीवनसाथीशी वाद टाळणे योग्य ठरेल. आर्थिक आवक चांगली राहिल, भावंडांच्या भेटीगाठी होतील. 

सिंह - सकारात्मक विचार राहतील असे प्रयत्न करा. संयमाची परीक्षा पाहिली जाईल, कामाचा ताण वाढेल. आपली कामे वेळच्यावेळी करणे गरजेचे आहे. जे लोक सतत नकारात्मक बोलतात, अशांना भेटणे टाळा. 

कन्या - एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. मान सन्मान मिळेल, लोकांना तुमचे महत्त्व पटेल. महत्त्वाच्या कामात बरकत राहिल. नोकरीत मान-सन्मान मिळेल. सहकारी मदत करतील, विविध प्रकारचे फायदे होतील. 

तूळ - व्यवसायात बरकत राहिल, आर्थिक आवक चांगली राहिल. मनात अडचणी राहतील, आनंदी विचार राहतील. अडचणी आपोआप दूर होतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. घरी पाहुणे येतील. विविध प्रकारचे लाभ होतील. ग्रहमानांची अनुकूलता बाजुने राहिल. 

वृश्चिक - काहींना प्रवास करावा लागेल, प्रवासकार्य साधक ठरतील. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहिल. आर्थिक आवक चांगली राहिल. व्यवसायात विक्री चांगली राहिल. करार करताना कागदपत्रे वाचून सही करा. वाहने सावकाश चालवा.   

धनू - महत्वाच्या कामात अडचणी येतील, खूप प्रतिक्षा करावी लागेल. व्यवसायात चांगली स्थिती राहील. कायद्याची बंधने पाळा. प्रवासात दगदग राहिल. सकारात्मक विचार राहतील. कुणाला दुखवू नका, इतरांना सल्ला देऊ नका.  

मकर - नोकरीत तुमच्या शब्दाचा मान राखला जाईल. व्यवसायात भरभराटी होईल. आर्थिक आवक चांगली राहिल. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. कायद्याची बंधने पाळा, महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवास कार्य साधक ठरतील. 

कुंभ - खर्चाचे अंदाजपत्रक बिघडेल, काही अनावश्यक खर्च होतील. व्यवसायात विक्री चांगली राहिल. हाती पैसा येईल, घरात लगबग सुरू राहिल. नवीन कपडे वस्तू खरेदी कराल. आपला नावलौकिक वाढविणाऱ्या घटना घडतील. 

मीन - नोकरीत अनुकूल परिस्थिती राहिल. तुमचे पारडे जड राहिल. सरकारी कामात यश मिळेल. लोकांचे सहकार्य मिळेल. अधिकारी तुमच्यावर खुश राहतील. व्यवसायात बरकत राहील. आर्थिक उलाढाली फायदेशीर ठरतील. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१