शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
4
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
5
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
6
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
7
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
8
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
9
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
10
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
11
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
12
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
13
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
14
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
15
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
16
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
17
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
19
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
20
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य 14 मार्च, 2022; तरुण वर्गाला प्रेमात यश, जमिनीचे व्यवहार सफल  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 7:34 AM

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...  

मेष- ज्येष्ठांचा सल्ला ऐकणे योग्य ठरेल. त्यामुळे फायदा होईल. व्यवसायात विक्री चांगली होईल. आत्मविश्वासाने कामे कराल. घरी पाहुणे येतील. नोकरीत अचानक मोठी संधी चालून येईल. मात्र त्यासाठी दगदग, धावपळ होईल. विविध प्रकारचे लाभ होतील.

वृषभ- कुणाचा अपमान होईल असे बोलू नका. निष्कारण लोकांना दुखवू नका. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. जवळचे प्रवास होतील. व्यवसायात गुंतवणूक कराल. त्यातून फायदा होईल. आर्थिक आवक चांगली राहील.

मिथुन- धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल. जमिनीचे व्यवहार सफल होतील, व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. वरिष्ठाचे सहकार्य मिळेल. घरातील सदस्याशी समन्वय ठेवणे आवश्यक आहे.

कर्क- मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. भेटवस्तू मिळतील. नोकरीत ताणतणाव राहील. तब्येतीची काळजी घ्या. थोडे संयमाने वागणे आवश्यक, लोकांशी संवाद साधा. गैरसमज करून घेऊ नका. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे हे लक्षात घ्या.

सिंह- खर्चावर नियंत्रण ठेवा. दगदगीची कामे टाळा. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडा संयम ठेवलेला बरा. कुणाला उसने पैसे देताना विचार करून द्या. आर्थिक आवक चांगली राहील, जीवनसाथीशी वादविवाद टाळणे बरे राहील.

कन्या- अनुकूल परिस्थिती राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. योग्य सल्ला मिळेल. चांगल्या लोकांच्या सहवासात याल. आर्थिक आवक मनासारखी राहील. मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील. जीवनसाथीचे हट्ट पुरवावे लागतील. आवडत्या छंदासाठी वेळ काढा.

तूळ - घरी पाव्हण्या रावळ्यांचा आदळ राहील. त्यांच्या सरबराईत वेळ जाईल. नोकरीत अनुकूल घटना घडतील. काही बदल होतील. तुमचे वर्चस्व राहील. घरात तुमचा अभिप्राय महत्त्वाचा ठरेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. मुलांशी संवाद साधा. त्यांच्या प्रगतीचा आढावा घ्या.

वृश्चिक - भाग्याची चांगली साथ राहील. कामानिमित्त प्रवास घडून येतील. प्रवास कार्य साधक ठरतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. मानसन्मान मिळेल. महत्त्वाच्या कामातील अडचणी दूर होतील.

धनू- महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. प्रवास शक्यतो टाळा. दगदगीची कामे करणे टाळा. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. काहीना बढती मिळू शकते. आर्थिक बाजू बळकट राहील. व्यवसायात भरभराट होईल.

मकर- महत्त्वाच्या कामात यश मिळेल. जीवनसाथीशी सूर जुळतील. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. भेटवस्तूची देवाण-घेवाण होईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. व्यवसायात तुमचे महत्त्व वाढेल. किरकोळ अडचणी दूर होतील.

कुंभ- नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. व्यवसायात भरभराट होईल. मालमत्तेच्या कामात यश मिळेल. मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च कराल. मात्र आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील.

मीन- कामे मार्गी लागतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल, सर्वांचे सहकार्य मिळेल, विविध प्रकारचे लाभ होतील. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. मित्र, मैत्रिणीच्या सहवासात मजेत वेळ जाईल. आर्थिक आवक चांगली राहील. 

- विजय देशपांडे ज्योतिष विशारद)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष