राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाष १०, १९४४. तिथी- चैत्र कृष्ण अमावस्य (दुसऱ्या दिवशी उत्तररात्री १.५८ पर्यंत) श्री शालिवाहन शके १९४४ शुभकृत नाम संवत्सर, नक्षत्र- रात्री ८.१३ पर्य़ंत अश्विनी. त्यानंतर भरणी. रास- मेष. आज- अनिष्ट दिवस. दर्श अमावस्या. सत्तू अमावस्या. राहू काळ- सकाळी ते १०.३० (राहू काळात महत्वाची कामे टाळा)
मेष- चतुराईने बोलून कामे उरकून घ्या. क्रोधाला आवर घातला पाहिजे. एकदम तडकाफडकी निर्णय घेऊ नका. कुणाचे मन दुखावले जाईल असे शब्द वापरू नका. आर्थिक आवक चांगली राहील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल.
वृषभ-महत्वाच्या कामात अडचणी येतील. मात्र आपण मुत्सद्दीपणाने वागून मार्ग काढाल. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत साधक-बाधक परिस्थिती राहील. काही लोक मदत करतील. योग्य सल्ला मिळेल. आर्थिक आवक मनासारखी राहील.
मिथुन-नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. उच्चपदस्थ लोकांचे सहकार्य मिळेल. वाहन सुख मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. मुलांना यश मिळेल, मनात थोडे काळजीचे विचार राहतील. काही कारणाने प्रवास करावा लागेल. जीवनसाथी चांगली साथ देईल.
कर्क- नोकरीत कामाचा ताण वाढेल. एखादी नवीन जबाबदारी घ्यावी लागेल. तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. मात्र दगदग होईल. श्रमसाफल्याचे समाधान मिळेल. मुलांची काळजी ग्या. त्यांना योग्य मार्गदर्शन करा. भाग्याची चांगली साथ राहील.
सिंह- महत्वाच्या कामात सफलता मिळेल. भाग्याची साथ राहील. प्रवास घडू शकतात. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. नावलौकीक वाढवणाऱ्या घटना घडतील. नोकरीत अनुकूल स्थिती राहील. आर्थिक आवक सामान्य राहील.
कन्या-हितशत्रुंपासून सावध राहा. कामाशी काम ठेवा. महत्वाच्या कामात अडचणी येतील. नोकरीत झेपेल तेवढीच कामे अंगावर घ्या. स्वत:हून जादा कामे ओढवून घेऊ नका. वाहने जपून चालवा. जीवनसाथी आपल्याला सांभाळून घेईल.
तूळ-भागिदारी व्यवसायात जपून व्यवहार करा. कागदपत्रे वाचून मगच सही करा, जीवनसाथीशी वाद टाळले योग्य ठरेल. सार्वजनिक कार्यात मधुर संभाषण ठेवा. कुणावर टीका करू नका. अन्यथा कटकटी निर्माण होतील. पोटाची काळजी घ्या. हलका आहार घ्या.
वृश्चिक-महत्वाचे काम पुढे ढकलणे ठीक राहील. आरोग्याची काळजी घ्या. मुलांच्या यशाच्या वार्ता काळतील. त्यांच्याशी संवाद साधा. चांगल्या घटना घडतील. तरुणांना योग्य संधी मिळतील. आर्थिक आवक चांगली राहील. नोकरीत वाद टाळा. वरिष्ठांना विरोध करू नका.
धनू-मुलांच्या बाबतीत योग्य निर्णय घ्या. घाईघाईत निर्णय घेऊ नका. नोकरीत प्रगतीच्या दृष्टीने हालचाली होतील. अनेकांचे सहकार्य मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. घरात सुख समाधान राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी वादविवाद टाळा.
मकर-नोकरीत कामाचा ताण राहील. मात्र तुमच्या कामाचे कौतुक होईल. धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. घरी पाहुणे येतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. काही कारणाने गैरसमज होतील.
कुंभ-धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. एखाद्या व्यवहारात मोठा फायदा होईल. जीवनसाथीशी वाद टाळणे योग्य ठरेल. मनासारखे भोजन मिळेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी संवाद साधा. गैरसमज टाळा. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील.
मीन-अनुकूल परिस्थितीचा फायदा घ्या. जीवनसाथीही सूर जुळतील. कायद्याची बंधने पाळा. महत्वाच्या वस्तू, कागदपत्रे नीट ठेवा. जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. कागदपत्रे तपासून घ्या. खाण्यापिण्याचे पथ्य पाळले पाहिजे.
- विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)