शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

राशीभविष्य - २५ नोव्हेंबर २०२० - मीनसाठी आनंदाचा अन् वृश्चिकसाठी काळजीचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 9:22 PM

कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...

मेषसर्दी, खोकला आणि ताप यामुळे तब्बेत बिघडेल. स्वकीयांचा वियोग होईल. दानधर्म करण्यात धनाची लूट होण्याची परिस्थिती निर्माण होईल. सबब सांभाळून राहा. मानसिक बेचैनी राहील. आणखी वाचा

वृषभपरिवारात सुख आणि शांती राहील. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत आनंदात वेळ घालवाल. उत्पन्नात आणि व्यापार धंद्यात वाढ होईल. रम्य स्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत आखाल.  आणखी वाचा

मिथुनआज शारीरिक, मानसिक सुख चांगले मिळेल. नोकरी- व्यवसायात आपल्या कामाची प्रशंसा होईल. व्यापारी कामाची कदर करतील. त्यामुळे तुम्हाला जास्त प्रोत्साहन मिळेल. बढतीचा योग आहे.   आणखी वाचा

कर्कआज आपण धर्म, ध्यान, देवदर्शन यात जास्त वेळ घालवाल असे श्रीगणेश सांगतात. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग येईल. शारीरिक व मानसिकदृष्टया प्रसन्न राहाल. भाग्योदयाची संधी मिळेल.  आणखी वाचा

सिंहआजचा दिवस प्रतिकूलतांचा आहे. तब्बेतीकडे अधिक लक्ष पुरवावे लागेल. बाहेरचे खाणे- पिणे टाळा. आजारामुळे खर्च करावा लागेल. नकारात्मक विचार मनावर प्रभाव पाडतील. कुटुंबातील व्यक्तींशी जपून राहा. आणखी वाचा

कन्याआजचा आपला दिवस अनुकूलतापूर्ण राहील. जीवनसाथी बरोबर जवळीकेच्या क्षणांचा आनंद घ्याल. दांपत्यजीवनात गोडी राहील. भिन्न लिंगीय व्यक्तीचे आकर्षण वाटेल. सामजिक व सार्वजनिक क्षेत्रांत मान- प्रतिष्ठा वाढेल.  आणखी वाचा

तूळनवीन कार्यारंभास शुभ दिवस दूरचा प्रवास, धार्मिक स्थळांना भेटीचा आज योग आहे. व्यवसाय धंद्यात फायदा. परदेशातील मित्रांचे समाचार मिळतील. सहकार्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्य सांभाळावे. संततीविषयी द्विधा मनःस्थिती राहील. आणखी वाचा

वृश्चिकतब्बेती विषयी थोडी तक्रार राहील. संततीची समस्या काळजीत टाकील. मानहानीची शक्यता आहे. शक्यतो यात्रा, प्रवास यात जपून राहा. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. आणखी वाचा

धनुशरीर आणि मनात उत्साहाचा अभाव राहील. मनावर चिंतेचे ओझे राहील. कौटुंबिक वातावरण कलुषित राहील. आईशी मतभेद होईल किंवा तिच्या तब्बेतीसंबंधी चिंता राहील. सार्वजनिक दृष्ट्या आपला मानभंग होऊ नये याकडे लक्ष द्या.  आणखी वाचा

मकरदैनंदिन कामात अनुकूलता लाभल्याने दिलासा मिळेल. गृहस्थी जीवनातील अडचणी दूर होत असल्याचा प्रत्यय येईल. संपत्ती विषयक कामांचा निर्णय होईल. व्यापार- धंद्यात आर्थिक लाभ होईल. भावंडांचे सहकार्य लाभेल. आणखी वाचा

कुंभवाणीवर ताबा ठेवाल तर अनेक समस्यांपासून बचाव होईल असे श्रीगणेश सांगतात. वाद-विवाद करताना जास्त खोलात जाऊ नका. अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवा. कामात अल्प यश मिळेल. समाधानाची भावना अनुभवाल.  आणखी वाचा

मीनआजचा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण राहील. घरात एखादे मंगल कार्य ठरेल. नवे काम आरंभ करण्यास दिवस चांगला आहे. नातलग, संबंधित आणि मित्र यांच्याशी भेट- संवाद घडतील. त्यांच्या समवेत बाहेर फिरायला वा जेवणासाठी जाण्याची संधी येईल. आणखी वाचा

टॅग्स :Astrologyफलज्योतिष