राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष १३, १९४३. तिथी : पौष शुक्ल प्रतिपदा. (रात्री ८.३२ पर्यंत), श्री शालिवाहन शके १९४३, प्लव नाम सवस्तर, नक्षत्र : दुपारी १.३३ पर्यंत पूर्वाषाढा, त्यानंतर उत्तराषाढा. रास : सायंकाळी ६. ५२ पर्यंत धनू, त्यानंतर मकर. आज : चांगला दिवस. राहू काळ : सकाळी ७.३० ते ९ ( राहू काळात महत्त्वाची कामे टाळा).
मेषविद्यार्थ्यांना यश मिळेल. भाग्याची उत्तम साथ मिळेल. पर्यटनाच्या निमित्ताने प्रवास होतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. कामात मनासारखे बदल होतील. तुमचे महत्त्व वाढेल. सहकाऱ्यांशी थोडे जुळवून घेण्याची गरज आहे. घरी पाहुणे येतील.
वृषभमहत्त्वाचे काम संध्याकाळनंतर मार्गी लागेल. प्रवासात दगदग होईल. विद्यार्थ्यांना उल्लेखनीय यश मिळेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. मात्र हितशत्रूपासून सावध राहा. क्रोधाला आवर घातला पाहिजे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
मिथुनमहत्त्वाची कामे दिवसा उजेडी करून घ्या. प्रवास शक्यतो टाळलेले बरे. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील, तरुणवर्गाला प्रेमात यश मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. भागिदारी व्यवसायात यश मिळेल. मुलांना यश मिळेल.
कर्कमहत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. थोडा संयम ठेवा. सूर्यास्तानंतर कामे मार्गी लागतील. अडचणीतून मार्ग निघेल. कामाची धावपळ करत असताना तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदाराची चांगली साथ राहील. आर्थिक आवक चांगली राहील.
सिंहजवळचे प्रवास करावे लागलील. मुलांना घवघवीत यश मिळेल. त्यांच्या इच्छा पूर्ण होतील. महत्त्वाचे काम सूर्यास्ताच्या आत पूर्ण करून घ्या. घरात थोडे तणावाचे वातावरण राहील. तुमच्या कामाचे कौतुक होईल. नावलौकिक वाढेल.
कन्याघरी पाहुणे येतील. पाहुण्यांची सरबराई करताना महिलांची धावपळ होईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. कामात उत्साह राहील. नवीन काम स्वीकारावे लागेल. जवळच्या प्रवासाचे योग आहेत, आर्थिक आवक चांगली राहील.
तूळआर्थिक लाभ होईल. विविध मार्गांनी धनप्रात्पी होईल. व्यवसायात भरभराट होील. मालाला चांगला उठाव होईल. कामानिमित्त प्रवास घडून येतील. नातेवाईकांच्या भेटी होतील. खाण्या-पिण्याची लयलूट राहील. नोकरीत नवीन जबाबदारी घ्यावी लागेल.
वृश्चिकधनलाभाच्या दृष्टीने अत्यंत चांगला काळ आहे. मालमत्तेची कामे मार्गी लागतील. त्यात आपल्याला फायदा होईल. मनासारखे भोजन मिळेल. नातेवाईकांच्या भेटी होतील. जवळचे प्रवास होतील. व्यवसायात चढ-उतार चालू राहतील.
धनुविवाहेच्छुकांसाठी अनुकूल काळ आहे. मनासारखे प्रस्ताव समोर येतील. प्रेम प्रकरणात यश मिळेल. आर्थिकदृष्ट्या भरभराट होईल. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. मनासारखे भोजन मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरीत लाभ होईल.
मकरमहत्त्वाच्या कामात अडचणी येतील. मात्र, सायंकाळनंतर अडचणी दूर होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. दूरचे प्रवास होतील. आर्थिक आवक चांगली राहील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. जीवनसाथीची चांगली साथ राहील.
कुंभधनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. आवडत्या माणसांचा सहवास लाभेल. प्रेमात यश मिळेल. भेटवस्तू मिळतील. नोकरीत थोडा ताण राहील. महत्त्वाचे काम दिवसा उजेडी पूर्ण करा.
मीननोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. प्रगती होईल, पगारवाढ व इतर आर्थिक फायदे होतील. ग्रहांचे पाठबळ मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. मित्रांच्या भेटीगाठी होतील. योग्य सल्ला मिळेल. घरी पाहुणे येतील.
- विजय देशपांडे (ज्योतिष विशारद)