शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
2
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
3
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
4
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
5
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
6
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
7
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
8
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
9
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
10
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
11
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
12
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
13
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
14
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
15
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
16
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

आजचे राशीभविष्य- ०३ एप्रिल २०२३: धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ; कामात सफलता मिळेल, वाहन जपून चालवा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 7:29 AM

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

राष्ट्रीय भारतीय सौर दिनाक चैत्र १३, १९४५. तिथी चैत्र शुक्ल त्रयोदशी (अहोरात्र) शालिवाहन शके १९४५. शोभन नाम संवत्सर, नक्षत्र: सकाळी ७:२४ पर्यंत मघा. त्यानंतर पूर्वा रास सिंह आज सामान्य दिवस, भगवान महावीर जयंती. प्रदोष, राहू काळ : सकाळी ७:३० ते ९. (राहू काळात महत्त्वाची कामे टाळा.)

मेष- विद्यार्थ्यांना चांगला काळ आहे. शैक्षणिक प्रगतीपुस्तक झळकते राहील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल. जवळच्या प्रवासाचे योग येतील. भावंडाशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. प्रेम प्रकरणे यशस्वी होतील.

वृषभ- नोकरीत कामाचा ताण वाढेल. नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्याना योग्य संधी मिळेल. घरी पाहुणे येतील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल.

मिथुन- व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो, नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. कामे मार्गी लागतील.

कर्क- धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. मनात सकारात्मक विचार राहतील. नोकरीत कामाचा ताण कमी राहील. सुखसोयी वाढवून मिळतील.

सिंह- मनात आनंदी विचार राहतील. आपल्या अनेक अडचणी दूर होतील. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल, प्रेम प्रकरणात यश मिळेल. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. विविध कामांना गती मिळेल.

कन्या- आपण हाती घेतलेल्या प्रकल्पात अडचणी येतील. काही कारणाने कामांना विलंब होईल. अनावश्यक खर्च होईल. काहीना प्रवास घडून येईल, मनावर ताबा ठेवा. कामे झालीच पाहिजेत असा अट्टहास करु नका, जीवनसाथीची चांगली साथ राहील.

तूळ- आपल्या प्रयत्नांना यश मिळेल.. अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेली कामे होतील. महत्त्वाचे निरोप येतील. मित्र, सहकारी यांची चांगली साथ राहील. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. कामात उत्साह राहील.

वृश्चिक- कार्यक्षेत्रात सतत कार्यरत राहावे लागेल. कामात बदल होतील. कामाचा ताण राहील. घरी पाहुणे मंडळी येतील. कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल, जीवनसाथीची काळजी घ्या. मुलांना योग्य संधी मिळेल. तुमची प्रशंसा होईल, कामावर लक्ष केंद्रित कराल.

धनू- भाग्याची उत्तम साथ तुम्हाला मिळेल. मनात आनंदी विचार राहतील. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. सामाजिक कार्यात आघाडीवर राहाल. प्रतिष्ठा प्राप्त होईल. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. जीवनसाथीची चांगली साथ राहील. महत्त्वाचे निरोप येतील.

मकर- आपल्या मनात अनेक शंका- कुशंका असतील. कामाचा ताण राहील. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. प्रवास शक्यतो टाळा. वाहन जपून चालवा. भावडांची ख्यालीखुशाली कळेल. व्यवसायात भरभराट होईल. जीवनसाथीची काळजी घ्या.

कुंभ- आपल्या अनेक अडचणी आपोआप दूर होतील. त्यामुळे मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. आवडते भोजन मिळेल. धनलक्ष्मीची तुमच्यावर प्रसन्न राहील.

मीन- महत्वाच्या कामात विलंब होईल. मात्र थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. चिडचिड करू नका. तब्येतीची काळजी घ्या. पुरेसा आराम करणे आवश्यक आहे. जोडीदार तुमची काळजी घेईल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. 

- विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)

टॅग्स :Astrologyफलज्योतिष