शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

आजचे राशीभविष्य - 13 जुलै 2021; भाग्योदयाचे प्रसंग येतील, अचानक धनलाभ होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 7:50 AM

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

मेष - स्वभावातील तापटपणा आणि हट्टीपणावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. खूप परिश्रमानंतर कमी यश प्राप्त झाल्याने नैराश्य येईल. संततीविषयक काळजी निर्माण होईल. पोटाच्या तक्रारीमुळे हैराण व्हाल. यात्रेत अडथळे येतील. सरकारी कामात मात्र यश मिळेल. आणखी वाचा

वृषभ - आज प्रत्येक काम दृढ़ आत्मविश्वास आणि खंबीर मनोबलासह कराल आणि त्यात यश मिळेल. वडिलांकडून व वडिलार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. सरकारकडून किंवा सरकारी कामातून आर्थिक लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासात चमकतील. कला आणि क्रीडा क्षेत्रांत कलाकारांना आपले कसब दाखविण्याची संधी मिळेल. आणखी वाचा

मिथुन - नवीन योजना अमलात आणण्यासाठी दिवस शुभ असल्याचा संकेत श्रीगणेश देतात. नोकरदारांना वरिष्ठ अधिकार्‍याकडून किंवा सरकारकडून परिश्रमाचा यथोचित मोबदला मिळेल. शेजारी- पाजारी, भावंडे तथा मित्रमंडळ यांच्या समवेत आनंदात वेळ घालवाल. भाग्योदयाचे प्रसंग येतील. आणखी वाचा

कर्क - गैरसमज आणि नकारात्मक व्यवहार आपल्या मनात ग्लानी निर्माण करतील. तब्बेतीचा विशेषतः डोळ्यांचा त्रास होईल. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होतील. कामासंबंधी समाधानाची भावना निर्माण होईल. धन खर्च होईल. विद्यार्थ्यांना विद्यार्जनात निर्धारित सफलता मिळणार नाही. आणखी वाचा 

सिंह - आज कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील आणि वडीलधार्‍यांचा सहवास लाभेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. स्वभावात संताप आणि वागण्यात तापटपणा राहील. त्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. दांपत्यजीवनात ताळमेळ राहील. आणखी वाचा

कन्या - आपल्या अहंपणामुळे आज भांडण होण्याची शक्यता आहे. शारीरिक आणि मानसिक चिंतेत दिवस जाईल. स्वभावातील उतावळेपणामुळे काम बिघडण्याची शक्यता आहे. अचानक पैसा खर्च होईल. कोर्टकचेरी आणि नोकरदारांपासून जपून राहा असे श्रीगणेश सांगतात. आणखी वाचा

तूळ - श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आजचा आपला दिवस शुभफलदायी आणि लाभदायक जाईल. मित्रांशी भेट होईल आणि त्यांच्यासह फिरायला जाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.  नोकरी व्यवसायात उत्पन्न वाढेल. व्यापारात विकासाच्या संधी मिळतील. अविवाहितांना विवाहयोग येतील. दांपत्यजीवनात उत्तम वैवाहिक सुख मिळेल. आणखी वाचा

वृश्चिक - गृहस्थी जीवनाची सार्थकता आज आपल्या लक्षात येईल. असे श्रीगणेश सांगतात. घरात आनंदाचे वातावरण राहील. प्रत्येक काम विनासायास पार पडेल. व्यापार्‍याना व्यापारात चांगल्या संधी प्राप्त होतील. उत्पन्न वाढेल. नोकरी धंद्यात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. संततीकडून समाधान मिळेल. मानप्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा

धनु - श्रीगणेश आज आपणाला तब्बेतीकडे लक्ष द्यायला सांगतात. कामात उत्साह आणि आवेशाचा अभाव राहील. मन चिंतायुक्त राहील. संततीची समस्या हे त्याचे कारण असू शकते. नोकरी व्यवसायात त्रास होईल. जोखमीचे विचार, व्यवहार ठरविण्यापूर्वी पूर्ण विचार करण्याची आवश्यकता आहे. उच्च अधिकारी आणि विरोधक यांच्याशी वादविवादात पडू नका असे श्रीगणेशांचे मत आहे. आणखी वाचा

मकर - नकारात्मक विचार प्रभावी होऊ न देण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. भागीदारां बरोबर संबंध बिघडतील. अचानक प्रवास करावा लागेल. त्यावर खर्च करावा लागला. नवे संबंध प्रस्थापित करणे हितकर ठरणार नाही. संतापावर काबू ठेवल्यामुळे अनेक संकटांपासून वाचाल. अचानक धनलाभ होईल. आणखी वाचा

कुंभ - श्रीगणेश कृपेने आजचा दिवस प्रसन्नतेमध्ये जाईल. आपला आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे कामात यश मिळणे सहज बनेल. स्वभावातील मौजवृत्ती मनाला स्फूर्ती देईल. भिन्न लिंगीय व्यक्तींशी परिचय होईल व प्रणय, रोमान्स होण्याची शक्यता आहे. जवळचा प्रवास घडेल. भागीदारीत लाभ होण्याचा योग आहे. आणखी वाचा

मीन - मनाचा खंबीरपणा आणि आत्मविश्वास आपले काम यशस्वी करील. कुटुंबात सुख- शांती, आनंदाचे वातावरण राहील. राग आणि बोलण्याची उद्धट पद्धत यांवर संयम ठेवा. नोकरीत वर्चस्व राहील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. आणखी वाचा 

टॅग्स :Zodiac Signराशी भविष्यhoroscope 2021राशिभविष्य २०२१Astrologyफलज्योतिष