आज जन्मलेली मुलंमंगळ हर्षल नवपंचम योगाचो समृद्ध सहकार्य घेऊन मुलांचा कार्यरथ नवीन नवीन क्षेत्रातून पुढे सरकत राहील. कर्क राशीचा प्रवाह नवीन कार्यपद्धतीशी समरस होणारा राहील. शिक्षण, परिचय, अर्थप्राप्ती यात आकर्षकता राहील. विज्ञानाशी शोध संपर्क शक्य आहे. कर्क राशी 'ड', 'ह' आद्याक्षर. - अरविंद पंचाक्षरी
पंचागबुधवार, दि. 28 ऑगस्ट 2019- भारतीय सौर 6 भाद्रपद 1941- मिती श्रावण वद्य त्रयोदशी 23 क. 29 मि.- पुष्य नक्षत्र 22 क. 56 मि., कर्क चंद्र- सूर्योदय 06 क. 24 मि., सूर्यास्त 06 क. 55 मि.- प्रदोष शिवरात्र
शुभाशुभ चौघडीदिवसाचे प्रत्येक दीड तासाप्रमाणे आठ विभाग आणि रात्रीचे आठ विभाग असे चौघडी प्रमाण असून पुढे सकाळी सहा प्रमाण धरुन आजच्या चौघडी दिलेल्या आहेत. आपल्या शहराच्या सूर्योदय-सूर्यास्त बघून या चौघडीचा उपयोग करावयाचा आहे. प्रारंभ सहाऐवजी सूर्योदयापासून पुढे करावा. दिवसा-सकाळी : 6 ते 7.30 लाभ, 7.30 ते 9 अमृत, 9 ते 10.30 काल, 10.30 ते 12 शुभ, 12 ते 1.30 रोग, 1.30 ते 3 उद्वेग, 3 ते 4.30 चंचल, 4.30 ते 6 लाभ. रात्री : 6 के 7.30 उद्वेग, 7.30 ते 9 शुभ, 9 ते 10.30 अमृत, 10.30 ते 12 चंचल, 12 ते 1.30 रोग, 1.30 ते 3 काल, 3 ते 4.30 लाभ, 4.30 ते 6 उद्वेग.
दिनविशेष1906 - नटवर्य चिंतामणी गोविंद तथा मामा पेंडसे यांचा जन्म.1908 - विनोदकार विनायक माधव तथा विमादी पटवर्धन दीक्षित यांचा जन्म.1928 - भारतीय पदार्थ वैज्ञानिक एम. जी. के. मेनन यांचा जन्म.1928 - सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद विलायत खाँ यांचा जन्म.1934 - न्यायमूर्ती सुजाता मनोहर यांचा जन्म.1962 - काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांचा जन्म.2001 - कथाकार, कादंबरीकार, नाटककार, पटकथाकार व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांचे निधन.