शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आठवड्याचे राशीभविष्य - 11 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर 2020, 'या' राशीला आनंदवार्ता मिळणार, प्रियजनांची भेट होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 9:49 AM

Weekly Horoscope 11 to 17 october 2020 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष 

 

आठवड्यात आपणास कामात संथ परंतु एका विशिष्ट गतीने वाटचाल करण्याची तसेच कौटुंबिक व व्यावसायिक आघाडीवर स्वतःचे स्थान मजबूत करण्याची इच्छा होईल. आठवड्याच्या सुरुवातीस आपल्यात अधिक उत्साह व जोम संचारेल. त्यामुळे प्रत्येक काम जोमाने पूर्ण करण्यास आपण तत्पर व्हाल. संपत्ती संबंधित निर्णय घेण्यात किंवा कागदपत्र बनवताना थोडी काळजी घ्यावी. शेअर्स बाजार किंवा सट्ट्याशी आधारित कामात सुद्धा आपण स्वारस्य दाखवाल. नियोजन पूर्वक केलेले साहस आपणास लाभ मिळवून देणारे असले तरी सध्या मोहा पासून दूर राहावे. दैनंदिन प्राप्तीत वाढ करण्याची संधी मिळू शकेल. विद्यार्थ्यांची अभ्यासातील गोडी टिकून राहिली तरी इतर प्रवृत्तीत अधिक वेळ जाणार नाही याची दक्षता घ्यावी. आठवड्याचे मधले दिवस प्रणयी जीवनासाठी उत्तम आहेत. आपण जर अविवाहित असून विवाह बंधनात अडकण्याची योजना आखत असाल तर आपले स्वप्न साकार होऊ शकेल. आठवड्याच्या मध्या पर्यंत आपण तंदुरुस्त असल्याचे आपणास जाणवले तरी उत्तरार्धात आरोग्य विषयक किरकोळ त्रास होण्याची शक्यता आहे. पूर्वी जर एखादे दुखणे झाले असले तर ते पुन्हा उचल खाण्याची शक्यता आहे.

वृषभ 

आपल्या व्यावसायिक जीवनात भागीदारी कार्ये, सांघिक कार्ये किंवा एखाद्याशी करार करण्याच्या कार्यात काही विघ्ने येताना दिसून येईल. मात्र, कामाप्रती आपले समर्पण असल्याने आपली सद्य स्थिती व दर्जा टिकवून ठेवू शकाल. धार्मिक संस्थेशी संबंधित कार्यात फायदा होऊ शकेल. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक स्थैर्य व निधीशी संबंधित साहसात सुद्धा लाभदायी फळ प्राप्त होईल. व्यावसायिक स्तरावर सुद्धा आपल्या दर्जात स्थैर्यासह वृद्धी होईल. सभोवतालची लोक आपणास अधिक मान देऊ लागतील. त्याच बरोबर आपल्या प्रसिद्धीत सुद्धा वाढ होईल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल असल्याने विशेषतः अंतर्गत किंवा सामान्य अभ्यासाशी संबंधित कोणत्याही परीक्षेत चांगल्या परिणामाची अपेक्षा बाळगू शकता. मात्र, ह्या यशाने हुरळून जाऊ नका. आठवड्याच्या सुरवातीस भावनाशील न होण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विवाहितांना वैवाहिक जीवनातील सौहार्दता वाढविण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतील. आठवड्याच्या मध्यास एखाद्या नाजूक प्रसंगी धीराने कामे करावीत. कुटुंबियांशी सुद्धा संबंधात सौम्य राहावे लागेल. प्रणयी जीवनासाठी उत्तरार्ध अनुकूल आहे. आरोग्य विषयक काळजी करण्या सारखे काही नसले तरी आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शारीरिक थकव्या व्यतिरिक्त रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची, पोटाशी संबंधित समस्या होण्याची शक्यता आहे.

मिथुन 

आठवड्याच्या सुरुवातीस आपण आर्थिक फायद्यासाठी अतिरिक्त लक्ष केंद्रित करून त्यात यशस्वी सुद्धा होऊ शकाल. पूर्वार्धात विशेषतः कोठून पैसे गोळा करण्यासाठी किंवा नवीन आर्थिक स्रोत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलात तर त्यात सकारात्मक परिणाम मिळवू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपले स्पर्धक किंवा विरोधक ह्यांच्यावर सहजपणे मात करू शकतील. आपल्या मनात नोकरी बदलण्याचे विचार येऊ शकतात. संस्थेत आपल्या पदास धोका निर्माण होणार नाही ह्याची विशेष काळजी घ्यावी. व्यावसायिक आघाडीवर आपल्यात उत्साह अधिक असल्याने कार्ये जलद गतीने पूर्ण होण्याची अपेक्षा बाळगाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूल असल्याने इच्छित कारकीर्द घडविण्यासाठी प्रयत्न करू शकाल. शनीच्या दुष्परिणामांमुळे आपली मानसिक स्थिती दोलायमान होण्याची शक्यता असून शारीरिक दुर्बलता निर्माण झाल्याने आरोग्यावर त्याचा प्रभाव अधिक होईल. सध्या आरोग्य विषयक काही त्रास असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. आपणास ताप येण्याची किंवा अचानकपणे शरीराचे तापमान वाढण्याची शक्यता अधिक आहे.

कर्क 

आठवड्याच्या सुरुवातीस आपण स्वतःवर अधिक लक्ष देऊन आपली हौसमौज पूर्ण करण्यात खर्च करू शकाल. व्यावसायिक आघाडीवर सुद्धा अधिक लक्ष केंद्रित करू शकाल. आपल्या कार्यात आपण अति नियोजनबद्ध व शिस्तबद्ध राहाल. दूरवरच्या कार्यात आपला उत्साह अधिक असल्याचे दिसून येईल. आठवड्याच्या मध्यास संभाषणात आपली वाणी अत्यंत प्रभावी राहील. संतती संबंधित बाबींवर सुद्धा आपले लक्ष खिळून राहील. बहुतांशी ग्रहांचा आपल्यावर लाभदायी प्रभाव असल्याने आपण प्रत्येक काम अंतर्ज्ञान व भावनांच्या आधारे कराल. आठवड्याच्या उत्तरार्धात आपण दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. कमाईसाठी नवीन संधी मिळू शकते. अभ्यासाप्रती आपले समर्पण चांगले असले तरी कोणत्याही विषयाचे आकलन होण्यासाठी सध्या आपणास अतिरिक्त परिश्रम करण्याची तयारी ठेवावी लागेल. संबंधातील सौख्य टिकून राहील. प्रेम व्यक्त करण्यासाठी आठवड्याचे मधले दिवस अनुकूल आहेत. अतिरिक्त आहार घेणे टाळावे. भोजन किंवा श्रमाच्या अतिरेकामुळे यकृत व रक्ताभिसरण संबंधित समस्या होऊ शकते.

सिंह 

आठवड्याच्या सुरुवातीस नवीन घर किंवा संपत्ती खरेदी करावयाची असल्यास काळजी घ्यावी किंवा एखाद्या जाणकाराचा सल्ला घेऊन निर्णय घ्यावा. आपले मन काहीसे व्याकुळ होण्याची शक्यता असल्याने राग अनावर होणार नाही ह्याची काळजी घेतल्यास संबंधातील संभाव्य वाद टाळू शकाल. आठवड्याच्या मध्यास आपल्या विचारात सकारात्मकता येऊन नवीन उत्साहासह कामात व जीवनात नव्याने सुरवात करण्याचा विचार करू शकाल. आठवड्याचे मधले दिवस प्रणयी जीवनाचे किंवा वैवाहिक जीवनाचे सौख्य उपभोगण्यासाठी अनुकूल असल्याचे दिसत आहे. सध्या आपल्यात भेटीगाठी किंवा भेटवस्तूंची देवाण - घेवाण होण्याची दाट शक्यता आहे. आपण स्वतःच्या किंवा जोडीदाराच्या खुशीसाठी सढळ हस्ते खर्च कराल. उत्तरार्धात प्राप्तीवर आपण अधिक लक्ष केंद्रित कराल. कामात वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळू शकेल. मित्रांशी प्रभावी संभाषण होण्याची शक्यता अधिक आहे. विद्यार्थ्यांना पूर्वार्धात अभ्यास काळजीपूर्वक करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

कन्या 

आठवड्याच्या सुरुवातीस शारीरिक व मानसिक प्रसन्नता जाणवेल. प्रेमसंबंधात प्रगती झाल्याने मनाचे समाधान होईल. असे असले तरी आपल्या भिन्नलिंगी आकर्षणात झालेली वाढ आपणास चुकीच्या मार्गावर नेणार नाही ह्याची काळजी घ्यावी. विशेषतः आठवड्याच्या मध्यास संबंध टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. उत्तरार्धात आपले पुन्हा मनोमिलन होईल. सुरवातीस आपल्याकडे प्राप्तीचा व लाभाचा पैसा असल्याने आर्थिकदृष्ट्या सुरवात चांगली होईल. असे असले तरी आठवड्याच्या मध्यास आर्थिक देवाण - घेवाण करताना सावध राहावे. उत्तरार्धात आपण स्वतःसाठी खर्च करण्याची शक्यता आहे. सुरवातीच्या व अखेरच्या दिवसात कुटुंबातील वातावरणात शांतता नांदेल. व्यावसायिक आघाडीवर आपली प्रगती होईल किंवा हाती असलेली कामे सुरळीतपणे पूर्ण होऊ शकतील. आठवड्याच्या मध्यास दैनंदिन कार्यात थोडी विघ्ने येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अति उत्साह किंवा आत्मविश्वास न बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

तूळ

आठवड्याच्या सुरुवातीस नोकरीत यशस्वी व्हाल व आपल्या चिकाटीमुळे व कौशल्यामुळे विरोधक सुद्धा आश्चर्यचकित होतील. गृहोपयोगी सामग्रीसाठी खर्च झाला तरी त्यामुळे आपले जीवन आरामदायी होणार असल्याने खर्चाच्या बाबतीत आपली काहीच हरकत नसेल. आठवड्याच्या मध्यास विशेष आर्थिक लाभ होण्याची शक्यता सुद्धा आहे. कुटुंबीयांप्रती विशेष लक्ष द्याल. तसेच एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी व्हाल किंवा घरात एखाद्या मंगल कार्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे. सध्या आपण कुटुंबात एखाद्या धार्मिक प्रसंगाचे आयोजन सुद्धा करू शकाल. संततीच्या विकासासाठी व प्रगतीसाठी आयोजन कराल. ह्या दरम्यान आपले प्रणयी जीवन फुलल्यामुळे आपण जोडीदारासह जवळपासच्या ठिकाणी फिरावयास जाण्याचे आयोजन करण्याची शक्यता सुद्धा आहे. उत्तरार्धात आपल्या मनात काही ना काही कारणाने खंत राहिल्याने एकटे राहण्यास आपण अधिक प्राधान्य द्याल. उत्तरार्धात खर्चाची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांना उत्तरार्धात अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

वृश्चिक

आठवड्याच्या सुरुवातीस आपणास नशिबाची साथ मिळेल. त्याच बरोबर आपण देशांतर्गत कार्ये किंवा जन्मभूमीहून दूरवरच्या कार्यात चांगली कामगिरी करून आपल्या कारकीर्दीस नवीन दिशा देऊ शकाल. आयात - निर्यात किंवा बहुराष्ट्रीय संस्थेशी संबंधित व्यापाऱ्यांना मोठे कंत्राट किंवा ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांवर वरिष्ठांची कृपा होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यास व्यावसायिक बाबतीत आपण अधिक सक्रिय व्हाल. कामाच्या ठिकाणी वैचारिक नावीन्य व सर्जनात्मकता ह्यांच्या जोरावर नवीन काहीतरी करण्यासाठी मार्ग सापडू शकेल. शेअर्स बाजार, वायदा बाजार किंवा कोणत्याही सट्टा सदृश्य कार्याशी संबंधित व्यक्तींना उत्तरार्धात काही लाभ मिळविण्याची संधी मिळाली तरी कोणताही निर्णय घेताना अति घाई करू नये. उत्तरार्धात एखादा चांगला लाभ मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी भिन्नलिंगी व्यक्तींशी जवळीक होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी आपणास शारीरिक थकवा व मानसिक बेचैनी जाणवेल. अशा स्थितीत नवीन काही करू नये. विद्यार्थ्यांना हा आठवडा अनुकूल आहे.

धनु 

आठवड्याच्या सुरुवातीस असलेले ग्रहमान आपणास धार्मिक यात्रा किंवा प्रवास करण्यास अनुकूल आहे. सुरवातीस आपले मन व्याकुळ राहिल्यामुळे कामात लक्ष कमी लागेल व संबंधात सुद्धा तणाव जाणवेल. ह्यातून मानसिक शांतता व आत्मपरीक्षण करण्यासाठी आपला कल धार्मिक गोष्टींकडे होईल. सुरवातीस आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. उत्तरार्धात परदेशात वास्तव्यास असलेल्या नातेवाईकांकडून मिळालेल्या बातमीमुळे आपले मन प्रफुल्लित होईल. आपल्या व्यापार - व्यवसायात लाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल. नवीन आयोजन कराल. ह्या व्यतिरिक्त व्यवसायात आर्थिक लाभ सुद्धा होऊ शकेल. व्यवसायात आपण नवीन विचारसरणीची अंमलबजावणी कराल. देशांतर्गत कार्यात सुद्धा फायदा होईल. मित्रांची भेट होऊन त्यांच्यासह सहलीस जाण्याची शक्यता निर्माण होईल. सांसारिक जीवन सुखद राहील. प्रेमीजनांना प्रियव्यक्तीचा सहवास लाभेल किंवा आधुनिक साधनांच्या मदतीने एकमेकांच्या संपर्कात राहता येईल. अखेरच्या दिवशी एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचे आयोजन करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा आशास्पद आहे.

मकर 

नोकरी किंवा व्यावसायिक क्षेत्रात आठवड्याची सुरुवात चांगली होऊन आपणास कार्यात किंवा लक्ष्यांक गाठण्यात यशस्वी होता येईल. आपली सर्व कामे सहजपणे पूर्ण झाल्याने मनास कार्य संतोषाची जाणीव होईल. सध्या देशांतर्गत कार्यात वाटचाल करू शकाल. व्यापारात नवीन धाडस करणाऱ्यांना किंवा नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी प्राप्त झाली तरी घाईघाईत निर्णय घेऊ नये. आठवड्याच्या मध्यास स्वतःच्या भावनाच आपणास दुर्बल करतील. संततीशी संबंधित कार्यात आपली व्यस्तता वाढेल. प्रियव्यक्ती किंवा वैवाहिक जोडीदाराशी संबंधित प्रश्नांत थोडी काळजी वाढण्याची किंवा त्यांच्याशी संबंधित कार्यासाठी आपणास अधिक वेळ द्यावा लागण्याची शक्यता आहे. सुरवातीच्या व अखेरच्या दिवशी संबंधांचे सौख्य उपभोगू शकाल, परंतु मधल्या दिवसात स्वतः एकटे राहण्यास आपण प्राधान्य द्याल. आध्यात्मिक उन्नतीसाठी किंवा त्यात नवीन काही शिकण्यासाठी आठवड्याचे मधले दिवस अनुकूल आहेत. उच्च शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्तरार्धात फायदा होऊ शकेल. त्वचा विकार, एलर्जी, गुप्तांगांचे विकार असणाऱ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी.

कुंभ

व्यावसायिक आघाडीवर आठवड्याच्या सुरवातीस विशेषतः नोकरी करणाऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल. आठवड्याच्या मध्यास व्यवसायात भागीदारांशी लाभदायी चर्चा होऊ शकेल. नोकरीत सांघिक कार्यातील लक्ष्यांक पूर्ण झाल्याने प्रशंसित व्हाल. कार्यालयात वरिष्ठांच्या सहकार्याची अपेक्षा बाळगू नये. त्यांच्याशी चर्चा करताना अधिक वाद घालू नये. कायदाकीय दस्तावेजांवर स्वाक्षरी करताना काळजी घ्यावी. ह्या आठवड्याच्या मध्यास हौसमौज किंवा मनोरंजनासाठी पैसे खर्च करून प्रियव्यक्तीस खुश ठेवू शकाल. वैवाहिक जोडीदाराशी जवळीक वाढेल. आपण संतती व कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालवून आनंदित व्हाल. उत्तरार्धात आपणास एकांतात राहून आत्मपरीक्षण करण्यास जास्त आवडेल. अभ्यासातील एकाग्रता वाढविण्यासाठी मन संयमित ठेवावे लागणे गरजेचे असल्याने नियमितपणे ध्यान - धारणा करावी. आठवड्यात आहारातील अनियमितता किंवा अपूर्ण निद्रा आपल्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करण्याची शक्यता आहे. पोटाचे विकार, आतड्यांचे विकार किंवा गुप्तांगांचे विकार होण्याची शक्यता आहे.

मीन 

आठवड्याच्या सुरुवातीस कौटुंबिक वातावरणात आनंद पसरेल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळण्याची शक्यता आहे. विवाहितांना पत्नी व संतती द्वारा लाभ होण्याची शक्यता आहे. प्रणयी जीवनात प्रगती साधण्यास पूर्वार्ध अनुकूल आहे. प्रियव्यक्ती किंवा स्नेहीजनांशी संबंध दृढ होतील. वैवाहिक जीवनात माधुर्य राहील. रात्री भोजन, भेटीगाठी ह्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकेल. दीर्घकालीन गुंतवणूक, प्राप्तीत वाढ करण्यासाठी नवीन स्रोत, नोकरीत प्रगती साधण्यासाठी बदल व व्यापार विस्तारणाचे आयोजन करण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. व्यापारात स्वतःच्या तर्कशक्तीमुळे प्रगती साधू शकाल. क्रोध नियंत्रित न ठेवल्यास विनाकारण संबंधात कटुता निर्माण होईल. भागीदारी कार्ये किंवा सांघिक कार्यात एखादा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी उत्तरार्ध अनुकूल आहे. स्पर्धात्मक परीक्षेतील ज्वलंत यशामुळे आपली प्रशंसा होईल. सामान्य अभ्यासात सुद्धा आठवड्याच्या सुरवातीस चांगले लक्ष देऊ शकाल. ह्या आठवड्याच्या मध्यास आरोग्य विषयक काळजी निर्माण होईल. एखादा अपघात संभवतो. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी सुद्धा आरोग्याची काळजी घ्यावी.

 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष