शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
3
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
4
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसे मिळवायचं
5
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
6
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
7
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
9
नागपुरात कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ, कोणती नावे शर्यतीत?
10
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
11
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
12
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
13
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
14
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
15
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
16
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
17
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
19
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - १३ मार्च ते १९ मार्च २०२२: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना धनप्राप्ती, नवीन नोकरीची संधी; विविध लाभाचा आठवडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 7:48 AM

Weekly Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आगामी आठवडा..., काय सांगते तुमची राशी...

मेष: फायदा होईल 

या सप्ताहात तुमच्या कामाचे कौतुक होईल. आपण जे कष्ट गेल्या काही दिवसांपासून घेतलेले आहेत, त्याचा आता फायदा होईल. नवीन नोकरीच्या शोधात असाल, तर अनुकूल संधी मिळेल. मनासारखे काम मिळेल. तुमच्या गुणवत्तेची कदर केली जाईल. तुमच्या ज्ञानाला पूरक असे वातावरण राहील. उच्च पदावरील लोकांमुळे फायदे होतील. व्यवसायात विक्री चांगली होईल. लोकांची ये-जा चालू राहील. सतत नातेवाईक व जवळच्या लोकांच्या संपर्कात राहाल. तब्येतीकडे पण पक्ष द्या. टीप - सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

वृषभ: यश मिळेल

अतिशय अनुकूल ग्रहमान आहे. आपण हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. त्यामुळे आनंद होईल. आत्मविश्वास वाढेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतील त्यांना सफलता मिळेल. योग्य मार्गदर्शन मिळेल. नोकरीत अनुकूल घटना घडतील. नवीन संधी मिळतील. व्यवसायात भरभराट होईल. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल. मनासारखे भोजन मिळेल. काहींना प्रसिद्धी मिळेल. टीप - सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.

मिथुन: धनलाभ होईल 

मन प्रसन्न राहील. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे कराल. धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. काहींना अचानक धनलाभ होईल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. त्यात तुमच्या कर्तृत्वाला वाव मिळेल. त्यामुळे वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. घरी पाहुणे येतील. लोकांच्या भेटीगाठी होतील. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. प्रवासकार्य साधक ठरेल. भावंडांशी सख्य राहील. व्यवसायात विक्री चांगली होईल. अधिकारात वाढ होईल. टीप - सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस. 

कर्क: अंदाज बरोबर ठरतील 

व्यवसायात बरकत राहील. मालाची विक्री चांगली होईल. आपले अंदाज बरोबर ठरतील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. नवीन संधीचा फायदा घ्या. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे करा. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न कराल. तरुण वर्गाला प्रेमात यश मिळेल. भेटवस्तू मिळतील. मालमत्तेची कामे मार्गी लागतील. भावंडांशी चांगले संबंध राहतील. आवडत्या छंदासाठी वेळ काढा. टीप - सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

सिंह: संधीचा फायदा घ्या

धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. चांगल्या संधी चालून येतील. विविध प्रकारचे लाभ होतील. काहींना भेटवस्तू मिळतील. दूरच्या प्रवासाचे योग येतील. कामात अचानक अडथळे येतील; पण, ते दूर होतील आणि यशाच्या मार्गावर गाडी धावू लागेल. जीवनसाथी चांगली साथ देईल. परस्परांचे सहकार्य राहील. मनासारखे भोजन मिळेल. जवळचे लोक भेटतील. त्यांच्यासमवेत वेळ मजेत जाईल. काही चांगल्या बातम्या कळतील. टीप - रविवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

कन्या: नावलौकिक वाढेल 

तुमचे महत्त्व वाढेल. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. तुमच्या कार्यपद्धतीची प्रशंसा होईल. काहींना प्रवास घडतील. प्रवास कार्य साधक ठरतील. मनावरील ताण निघून जाईल. आनंदी विचार राहतील. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. त्यासाठी फार प्रयत्न करण्याची गरज नसेल. नोकरीत अनुकूल बदल होतील. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. आर्थिक आवक मनासारखी राहील. त्यामुळे खर्च करताना हात ढिल्ला राहील. टीप - सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

तूळ: सफलता मिळेल

ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. जवळपास सर्व कामे सफल होतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. मनात आनंदी विचार राहतील. आर्थिक आवक मनासारखी राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. घरासाठी महागड्या वस्तू खरेदी कराल. प्रवास कार्य साधक ठरतील. भाग्याची चांगली साथ राहील. मुले अभ्यासात प्रगती करतील. नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. त्यात तुमच्या कर्तृत्वाला वाव मिळेल. टीप - रविवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.

वृश्चिक: प्रवास कार्य साधक ठरतील

मनासारखी धनप्राप्ती होईल. अनुकूल परिस्थिती राहील. सर्वांचे सहकार्य मिळेल. नोकरीत चांगली संधी मिळेल. त्या संधीचा आपण पुरेपूर फायदा घ्याल. काम पूर्ण करून दाखवण्याची जिद्द राहील. प्रवास कार्य साधक ठरतील. प्रसिद्धी मिळेल. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. व्यवसायात बरकत राहील. तुमचे महत्त्व वाढेल. तुमचे अडाखे बरोबर ठरतील. तुमच्यामुळे इतरांना फायदा होईल. घरी पाव्हण्या रावळ्यांचा आदळ राहील. टीप - सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.  

धनु: अचानक धनलाभ होईल

मोठ्या उलाढाली फायदेशीर ठरतील. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. अधिकार वाढवून मिळतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. मालमत्तेच्या कामात फायदे होतील. धनलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील. घरात खेळीमेळीचे व उत्साहाचे वातावरण राहील. काही घरात मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे. नातेवाइक व भावंडांच्या भेटीगाठी होतील. वडीलधाऱ्या मंडळींचा सल्ला मोलाचा ठरेल. मुलांच्या यशामुळे आनंद होईल. टीप - बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

मकर: भरभराट होईल

यश तुमचेच आहे. मात्र, धडपड करावी लागेल. अनेक लोकांच्या संपर्कात याल. संयमाने वागणे आवश्यक आहे. गोड बोलून आपली कामे करून घ्या. व्यवसायात भरभराट होईल. मालाची विक्री चांगली राहील. नफ्याचे प्रमाण वाढेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. कामात सतत कार्यरत राहावे लागेल. प्रवासात दगदग होईल. काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कामाबरोबरच आरामाकडेही लक्ष दिले पाहिजे. भाग्याचे पाठबळ मिळेल. टीप - रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस. 

कुंभ: कर्तृत्वाला वाव मिळेल

चांगल्या संधी चालून येतील. लोक तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर बसवतील त्यांची कामे करून घेण्याचा प्रयत्न करतील. मात्र, उत्साहाच्या भरात खूप दगदग होईल, अशी कामे करू नका. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. संयमाची परीक्षा पाहिली जाईल. शेवटी यश मिळणारच आहे, हे लक्षात घ्या. मुत्सद्दीपणाने वागून कामे करून घ्या. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. आपल्या आधी केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. टीप - रविवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस. 

मीन: अनुकूलता राहील

प्रगतीच्या दृष्टीने हालचाली होतील. नवीन नोकरीच्या संधी मिळतील. प्रवास कार्य साधक ठरतील. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. एखादी भेटवस्तू देण्यास हरकत नाही. शेती, जागेच्या व्यवहारात फायदा होईल. आर्थिक आवक राहील. बचत करता येईल एवढा पैसा मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील. न्यायालयीन कामे तुमच्या अनुकूल होतील. टीप - सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.

- विजय देशपांडे 

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य